26 किमी मायलेजसह दमदार फीचर्स, मारुतीच्या 7 सीटर कारचा बाजारात धुमाकूळ

| Updated on: Nov 08, 2021 | 4:53 PM

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहक सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारला त्यांची पसंती देत ​​आहेत. इलेक्ट्रिक कारची किंमत अजूनही खूप जास्त असल्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहक सध्या तरी सीएनजी बसवलेल्या कारला अधिक पसंती देत ​​आहेत.

26 किमी मायलेजसह दमदार फीचर्स, मारुतीच्या 7 सीटर कारचा बाजारात धुमाकूळ
Ertiga
Follow us on

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहक सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारला त्यांची पसंती देत ​​आहेत. इलेक्ट्रिक कारची किंमत अजूनही खूप जास्त असल्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहक सध्या तरी सीएनजी बसवलेल्या कारला अधिक पसंती देत ​​आहेत. कदाचित याच विचारामुळे ऑक्टोबरमध्ये मारुती सुझुकी अर्टिगाला सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत तिसरे स्थान मिळाले आहे. एवढेच नाही तर ही कार देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर एमपीव्ही देखील ठरली आहे. (Maruti Suzuki Ertiga become best selling MPV car in india, know price, features)

ऑक्टोबर 2021 मध्ये मारुती सुझुकी अर्टिगाच्या एकूण 12,923 युनिट्सची विक्री झाली आहे. याच्या वर फक्त मारुती सुझुकी अल्टो आणि बलेनो या दोन कार पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होत्या. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत, Ertiga ने ऑक्टोबर 2020 मध्ये 7,748 युनिट्सची विक्री केल्यामुळे एकूण 67 टक्के वाढ नोंदवली आहे. मारुती सुझुकी अर्टिगा हे कंपनीच्या अशा मॉडेल्सपैकी एक आहे, ज्या मॉडेलने गेल्या महिन्यात विक्रीत वाढ नोंदवली आहे.

Maruti Suzuki Ertiga ची किंमत

मारुती सुझुकी एर्टिगा ही एक एमपीव्ही कार आहे आणि या कारची किंमत 7.96 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.69 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. ही एक 7 सीटर कार आहे. यासोबतच यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 105PS पॉवर आणि 138Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते.

मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 19.01kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 17.99kmpl ची फ्यूल एफिशिएन्सी मिळते. यात कंपनीने बसवलेला सीएनजी पर्यायही आहे. मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही CNG फिटेड 1.5-लीटर पेट्रोल इंजिन कार 26.08km/kg मायलेज देऊ शकते.

Maruti Suzuki Ertiga चे फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास आपण सर्वात आधी याच्या एअरबॅग्सबद्दल बोलूया. Ertiga मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, isofix चाइल्ड सीट अँकर आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आहेत. तसेच, Ertiga ला प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स, LED टेल लॅम्प्स, 15-इंचांची चाके, 7 इंच इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळते, जी Android Auto आणि CarPlay तसेच पुश-बटण स्टार्ट/स्टॉप फीचरसह येते. यातील अनेक फिचर्स टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. Ertiga मध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट कप होल्डर, ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर देण्यात आलं आहे. या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील मिळतो, जो खूप उपयुक्त ठरतो.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Maruti Suzuki Ertiga become best selling MPV car in india, know price, features)