मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक म्हणजे ब्रेझा (Brezza) आहे. नुकताच या कारचा नवीन लूक समोर आला आहे. रिपोर्टनुसार, मारुती सुझुकीने आपल्या अपकमिंग ब्रेझा मॉडेलमध्ये अनेक बदल केले आहेत. अपकमिंग ब्रेझा प्रीमिअम लूक (premium look) आणि डिझाईनच्या बाबतीत सध्याचे मॉडेल खूप वेगळे आहे. ब्रेझाचे नवीन मॉडेल जूनमध्ये ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने नवीन ब्रेझाला आकर्षक एसयुव्हीचा लूक देण्यासाठी याच्या फ्रंटला आणि टेल सेक्शनला पुन्हा डिझाईन केले आहे. तर दुसरीकडे अपकमिंग ब्रेझामध्ये नवीन ग्रिल आणि DRLs बघायला मिळणार आहे, असे असले तरी कंपनीने अद्याप या सर्व माहितीला दुजोरा दिलेला नाही.
मारुती सुझुकीच्या MPV आणि हॅचबॅक कारची भारतीय बाजारात चांगली पकड आहे. परंतु एसयुव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स, ह्युंडाई आणि किआ सारखी कंपन्यांनी चांगला लिड घेतला आहे. अशात मारुती सुझुकीदेखील भारतात एसयुव्ही बाजारात आपले मार्केट शेअर वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. मारुती सुझुकी ब्रेझाचे नवीन मॉडेल एसयुव्ही सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
युजर्सना ब्रेझाच्या नवीन मॉडेलच्या बंपरमध्येही मोठे बदल झालेले दिसून येणार आहे. कारच्या बंपर आणि हेडलाईटला एसयुव्ही टच देण्यासाठी त्याला पुन्हा रि-डिझाईन करण्यात आले आहे. अपकमिंग कार ट्विन DRLs सोबत बाजारात येणार असून त्यात, टर्न इंडिकेटरदेखील डबल मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन ब्रेझा ड्युअल टोन फिनिश 16 अलॉय व्हीलसोबत येणार आहे.
मारुती सुझुकी ब्रेझाच्या नवीन मॉडेलमधून विटाराचे नाव हटविणार आहे. ब्रेझाचे 2022 माडेल मारुती सुझुकी ब्रेझाच्या नावाने ओळखले जाणार आहे. अपकमिंग ब्रेझा दोन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यात, रेड विद ब्लॅक रुफ आणि ब्लू विद ब्लॅक रुफ यांचा समावेश असणार आहे. कंपनीने याच्या फ्रंट आणि टेल सेक्शनपासून ते ग्रिलपर्यंत संपूर्ण रि-डिझाईन केले आहे. नवीन ब्रेझाचे इंजिन अर्टिगाच्या नुकतेच लाँच करण्यात आलेल्या अर्टिगासारखे असणार आहे. यात, Progressive Smart Hybrid टेक्नोलॉजीसोबत नॅच्युरली एस्पिरेटेड ड्युअल व्हीव्हीटी आणि ड्युअल जेट 1.5 लीटर पेट्रोज इंजिनची पॉवर मिळणार आहे. अपकमिंग कार सीएनजी व्हेरिएंटसह उपलब्ध होणार आहे.