मुंबई : पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दादर (पश्चिम) परिसरातील मनपा सार्वजनिक वाहनतळामध्ये उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे आज लोकार्पित करण्यात आलेले चार्जिंग स्टेशन हे सार्वजनिक वाहनतळांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले राज्यातील पहिले ‘इ. व्ही. चार्जिंग स्टेशन’ आहे. (new charging station for electric vehicles started in Dadar Mumbai, charge 7 vehicles at a time)
दादर (पश्चिम) परिसरातील प्लाझा चित्रपट गृहानजिक व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाजवळ असणाऱ्या मनपा सार्वजनिक वाहनतळातील (कोहिनूर) दुसऱ्या मजल्यावर इ. व्ही. चार्जिंग स्टेशनची सुविधा आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. हे एक अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन असून येथे एकाच वेळी 7 वाहनं चार्ज केली जाऊ शकतात. चला तर मग मुंबई मनपाच्या या चार्जिंग स्टेशनची वैशिष्ट्ये जाणू घेऊयात.
- E.V. हे इलेक्ट्रिक वाहनाचे संक्षिप्त रूप आहे. E.V. ही अशी वाहने आहेत, की जी एकतर अंशतः किंवा पूर्णपणे विद्युत शक्तीवर चालतात. इलेक्ट्रिक वाहनांचा इंधन खर्च कमी असतो. कारण त्यांची हालचाल करणारे भाग कमी असतात आणि कमी किंवा नगण्य जीवाश्म इंधन (पेट्रोल किंवा डिझेल) वापरतात. त्यामुळे पर्यावरणास ते अनुकूल असतात.
- चार्जिंग स्टेशन, ज्याला EV चार्जर देखील म्हणतात हा प्लग-इन इलेक्ट्रिक वाहने (संकरित, इलेक्ट्रिक वाहने, ट्रकसह, बसेस आणि इतर) चार्ज करण्यासाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या उपकरणांचा एक भाग आहे.
- ईव्ही चार्जरचे 2 प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : अ) डीसी चार्जर (जलद चार्जर, औद्योगिक श्रेणी, 1 ते 1.30 तासांमध्ये इलेक्ट्रिक वाहन पूर्णपणे चार्ज करते, ब) एसी चार्जर (संथ चार्जर, घरगुती/घरगुती श्रेणी, इलेक्ट्रिक वाहन 6-7 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करते)
- दादर (पश्चिम) परिसरातील सार्वजनिक वाहनतळामध्ये (कोहिनूर) 2 डीसी जलद चार्जर बसवले आहेत, जे एकावेळी 4 वाहने वेगाने चार्ज करतील आणि 3 संथ चार्जर देखील असून जे एकावेळी 3 वाहने चार्ज करतील.
- या वाहनतळामध्ये आता दररोज (24 तासांमध्ये) साधारणपणे 72 इलेक्ट्रिक वाहने चार्ज होऊ शकतात.
- सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहन (2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहने इ.) आणि सर्व प्रकारच्या ब्रँड (टाटा, एमजी हेक्टर, ह्युंदाई इ.) यांना चार्ज करण्यास सक्षम आहे.
- इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठीची किंमत 15 रुपये प्रती युनिट आहे.
- इलेक्ट्रिक वाहनाला पूर्ण चार्ज होण्यासाठी 20 युनिट्स – 30 युनिट्स लागतात ज्याची किंमत 200 ते 400 रुपयांपर्यत जाईल आणि अंदाजे चलन क्षमता (ड्रायव्हिंग रेंज) 140-170 किमी इतकी आहे.
- चार्जिंग सुविधा 24 x 7 उपलब्ध आहे.
- सार्वजनिक वाहनतळ आरक्षणासाठी नागरिकांना ऑनलाइन अॅपद्वारे आरक्षण सुविधा देखील उपलब्ध असून ‘ओटोपार्क मोबाईल अॅप्लिकेशन’ द्वारे कोहिनूर सार्वजनिक वाहनतळावर ऑनलाईन पार्किंग बुक आणि आरक्षित करता येईल.
- ऑनलाईन बुकिंग अॅप हे चालकांना वाहनतळामध्ये पार्किंगची ताशी किंवा मासिक आधारावर आरक्षण करण्यास मदत करेल. तसेच वाहनतळावर आल्यावर पार्किंगची खात्रीशीर जागा मिळवून देईल. यामुळे पार्किगसाठी जागा शोधण्यातला वेळ वाचणार असून, परिणामी इंधन खर्चातदेखील बचत होणार आहे.
- ओटोपार्क SINE हे अॅप आय.आय.टी., मुंबई यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले असून, यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने आणि NIDHI EiR या योजनेअंतर्गत भारत सरकारने निधी दिला आहे.
- हे अॅप नागरिक ‘प्ले स्टोअर’ वरून डाउनलोड करू शकतात आणि वाहनतळामध्ये जागा आरक्षित करण्यासाठी वापरू शकतात तसेच ओटोपार्क ऍपद्वारे मुंबईतील इतर वाहनतळ मध्ये आरक्षण करणे शक्य आहे.
- हे अॅप मुंबईकरांना ‘नो पार्किग’ क्षेत्रात आल्यावर सूचना पाठवून दंड आकारण्यापासून मदत करते आणि त्यांना जवळच्या उपलब्ध पार्किंगसाठी मार्गदर्शन करते. तसेच हे अॅप जास्तीत-जास्त सुरक्षेसाठी यात आधार पडताळणी तंत्रज्ञान समाविष्ट आहे.
- या वाहनतळामध्ये वाहन धुलाई केंद्र (कार वॉशिंग सेंटर) सुविधा देखील उपलब्ध आहे.
- या वाहनतळामध्ये विद्युत कारला चार्ज करण्यासाठी किंवा कार धुवायची वाट पाहात असताना, ड्रायव्हर्स लाऊंज मध्ये प्रवासी आराम करू शकतात. या ठिकाणी चहा-नाश्त्याची सुविधा सशुल्क पद्धतीने उपलब्ध आहे.
इतर बातम्या
शानदार फीचर्ससह टाटा मोटर्सची सर्वात छोटी SUV लाँचिंगसाठी सज्ज, Creta, Seltos ला टक्कर
ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरात परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर
7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?
(new charging station for electric vehicles started in Dadar Mumbai, charge 7 vehicles at a time)