KTM 390 Duke
Image Credit source: social
नवी दिल्ली : नवीन जनरेशन 2023 केटीएम 390 ड्यूक (New Gen 2023 KTM 390 Duke) बाइक लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या बाईकमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. या बाइकच्या लाँचिंगनंतर अधिकृत फीचर्स, डिझाईन (Design) आणि इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळणार आहे. परंतु त्या आधी या बाईकच्या पाच अशा काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. रेंडर्स, रोड टेस्टिंग आणि लीक्स रिपोर्टच्या माध्यमातून या बाइकच्या काही खास बाबी समोर आल्या आहेत. सध्याच्या व्हेरिएंटच्या तुलनेमध्ये अपकमिंग मॉडल न्यू हेडलाइट्स (New headlights), न्यू फ्यूअल टँक आणि टीएफटी इंस्ट्रूमेंट क्लस्अरसह उपलब्ध होणार आहे.
- न्यू जनरेशन केटीएम 390 ड्यूकच्या सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अपकमिंग मॉडेल अधिक आकर्षक असणार आहे. अपकमिंग बाइकमध्ये न्यू हेडलँप, न्यू हेड काउल, न्यू डिझाईन असलेले फ्यूल टँक आणि शार्पनर टँक एक्सटेंशन असणार आहेत. सोबत यात एलईडी टेल लाइट्सलाही रिडिझाईन करण्यात आले आहे.
- न्यू जनरेशन केटीएम 390 ड्यूकमध्ये न्यू फ्रेम, न्यू रियर सब फ्रेम दिसून येणार आहेत. सोबत यात युएसडी फ्रंट फोर्क्स सध्याच्या मॉडेल सारखीच असणार आहेत. सोबत न्यू स्विंगआर्म उपलब्ध होणार आहेत. नवीन जनरेशन आरसी 390 अंतर्गत अलॉय व्हील्स मिळणार आहे. तसेच नवीन मॉडेल सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक हलके असण्याची शक्यता आहे.
- न्यू जनरेशन केटीएम 390 ड्यूकमध्ये सध्याच्या व्हेरिएंटच्या तुलनेत वेगळा टीएफटी इंस्ट्रूमेंट कंसोल देण्यात येणार आहे. यात न्यू लेआउट आणि फंक्शनचाही समावेश असणार आहे. सोबतच ब्रेकिंग सिस्टमला देखील अधिक चांगली केली जाणार आहेत. फ्रंटवर डिस्क देण्यात येणार आहे.
- अपकमिंग बाइकमध्ये 373.2 सीसीचे इंजिन देण्यात येणार आहे. यात लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन उपलब्ध होणार आहे. यात काहीसे बदल करण्याचे संकेत कंपनीकडून देण्यात आलेले आहेत. हे पावरहाउस 43.5 पीएसची पावर आणि 37 एनएमची पावर देउ शकते. ही 5 स्पीड सीक्वेंशनल ट्रांसमिशनसह उपलब्ध होणार आहे.
- अपकमिंग बाइक पहिले जागतिक बाजारात लाँच करण्यात येणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटीपर्यंत ती भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अद्याप कंपनीकडून या बाइकच्या लाँचिंगबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या बाइकची संभावित किंमत 3 लाख रुपयांपर्यंत असू शकते.