Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलच्या गाड्या कायमच्या हद्दपार होणार? कधीपर्यंत? गडकरींचं उत्तर ऐकण्यासारखंय!

पेट्रोल-डिझेलच्या गाड्या कायमच्या हद्दपार होणार? कधीपर्यंत? गडकरींचं उत्तर ऐकण्यासारखंय!

| Updated on: Mar 16, 2022 | 9:25 PM

Nitin Gadkri on Eclectic Vehicle : पेट्रोल-डिझेल गाड्या अनेक देश हद्दपार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रश्न यावेळी राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी उत्तर दिलंय.

राज्यसभेत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांना घेऊन महत्त्वाची चर्चा पार पडली. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी नितीन गडकरींना प्रश्न उपस्थित केला होता. पेट्रोल-डिझेल गाड्या अनेक देश हद्दपार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रश्न यावेळी राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी उत्तर दिलंय. पेट्रोल-डिझेलच्या गाड्या हद्दपार करण्याबाबत सरकारची नेमकी काय योजना आहे? कधीपर्यंचा अवधी यासाठी सरकारनं नेमका ठरवलेला आहे? या अनुशंगानं प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी असा कोणताही ठोस प्लान सरकारचा नसल्याचं म्हटलं. मात्र येत्या तीन वर्षात इलेक्ट्रीक गाड्यांच्या विक्रीत आणखी तेजी पाहायला मिळेल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राचा संपूर्ण खेळच येत्या तीन वर्षात पूर्णपणे बदलून जाईल, असं अंदाज वर्तवला आहे. 2021 वर्षात 1.4 टक्के इलेक्ट्रीक गाड्यांची नोंदणी झाली असल्याचं गडकरींनी म्हटलंय. दरम्यान, लोकं नैसर्गिकरीत्याच इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे वळतील, असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केलाय.

Published on: Mar 16, 2022 09:23 PM