Rising Production Costs : आता तुमची आवडती SUV झाली आहे महाग; तुम्हाला मोजावी लागणार 30 ते 70 हजारांची जास्तीची किंमत!

| Updated on: May 05, 2022 | 4:33 PM

Skoda ने आपल्या सुंदर SUV Kushaq च्या किमती 70 हजारांपर्यंत वाढवल्या आहेत.

Rising Production Costs : आता तुमची आवडती SUV झाली आहे महाग; तुम्हाला मोजावी लागणार 30 ते 70 हजारांची जास्तीची किंमत!
SUV
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : भारतात वाढत्या उत्पादन खर्चामुळे (rising production costs) कार कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. टाटा ते मारुती, महिंद्रा आणि आता स्कोडा सुद्धा. उत्पादन खर्च वाढल्याने कार कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल्सच्या किमती (Prices of models) वाढवल्या आहेत. टाटा ते मारुती, महिंद्रा आणि आता स्कोडा या कंपन्यांनीही आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. Skoda ने आपल्या सुंदर SUV Kushaq च्या किमती 70 हजारांपर्यंत वाढवल्या आहेत. याशिवाय स्कोडा आपल्या SUV Kushaq चे Monte Carlo प्रकार देखील ९ मे रोजी लॉंच करणार आहे. तुम्ही SUV Kushaq खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता आणखी अधिक पैसे खर्च करावे लागतील. Skoda ने अधिकृत वेबसाइटवर आपल्या फ्लॅगशिप कॉम्पॅक्ट SUV Kushaq ची नवीन किंमत यादी जाहीर केली आहे. कंपनीने काही व्हेरियंटच्या (Of some variants) किमतीत 70 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

‘ह्युंदाईच्या क्रेटा’ आणि ‘कियाच्या सेल्टो’सशी स्पर्धा

Skoda ने ही SUV गेल्या वर्षी जूनमध्ये लॉंच केली होती. ही कार लाँच होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. ही एसयूव्ही थेट ह्युंदाईच्या क्रेटा आणि कियाच्या सेल्टोसशी स्पर्धा करेल. किंमत वाढवण्यासोबतच या कारचे नवीन मॉन्टे कार्लो व्हेरिएंट लॉन्च होणार आहे.

काय आहे Kushaq ची नवीन किंमत?

Skoda च्या अधिकृत वेबसाईटनुसार, 1.0 लीटर TSI इंजिनसह येणार्‍या Kushaq च्या एंट्री लेव्हल ऍक्टिव्ह व्हेरिएंटमध्ये 30,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या एंट्री लेव्हल वेरिएंटची लॉंच किंमत 10.49 लाख होती, जी नंतर 10.99 लाख करण्यात आली. Kushaq 1.5 लीटर स्टाइल वेरिएंटची सर्व मॅन्युअल प्रकारांमध्ये एक्स-शोरूम किंमत आता 17.19 लाख रुपये आहे, जी 70 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर, स्कोडा ने कुशक मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत. ऑटोमॅटिक 1.0 लीटर अ‍ॅम्बिशन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत रु. 14.59 लाख पासून सुरू होते. कंपनीने या व्हेरियंटच्या किमतीत 25 हजार रुपयांनी वाढ केली आहे. 1.5 लिटर स्टाइलिंग (डीसीटी गिअरबॉक्स) आणि 6 एअरबॅगसह कुशकच्या टॉप रेंज मॉडेलच्या किंमतीत 60,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता या प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 18.79 लाख रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

या गाड्यांवर काहीही परिणाम नाही

स्कोडाने वाढवलेल्या किमतीचा परिणाम कुशकच्या काही प्रकारांमध्ये दिसून आलेला नाही. अ‍ॅम्बिशन क्लासिक मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकच्या किमती वाढल्या नाहीत. या प्रकाराची एक्स-शोरूम किंमत रु. 12.69 लाख आहे, जी बेस व्हेरिएंट Active आणि Ambition दरम्यान येते. अ‍ॅम्बिशन क्लासिकच्या ऑटोमॅटिक व्हर्जनची किंमत 14.09 लाख रुपये आहे. मॉन्टे कार्लो पुढील आठवड्यात लाँच होणार आहे स्कोडा आता कुशकची नवीन मॉन्टे कार्लो व्हर्जन लॉंच करणार आहे, जी एक वर्षापूर्वी लॉंच झाली होती. कंपनी यामध्ये काही नवीन अपडेट्स देखील आणत आहे. त्याच्या इंटरनल डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले असून, हे व्हर्जन वेगळ्या थीमसह सादर केली जाईल.