Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेताय, Ola, Ather, TVS या कंपन्या बॅटरीची किती वर्षांची वॉरंटी देतात?

| Updated on: Oct 17, 2024 | 1:57 PM

Electric Scooter : नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेताना तुम्हाला काही गोष्टींची माहित असणं गरजेच आहे. तुम्ही जी स्कूटर विकत घेताय, त्यामध्ये स्कूटरच्या बॅटरीची वॉरंटी किती आहे?

Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेताय, Ola, Ather, TVS  या कंपन्या बॅटरीची किती वर्षांची वॉरंटी देतात?
electric scooter
Image Credit source: TVS
Follow us on

Electric Scooters ची मार्केटमध्ये डिमांड वेगाने वाढतेय. या फेस्टिव सीजनमध्ये तुम्ही नवीन स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला स्कूटरच्या बॅटरी संदर्भात माहिती असणं गरजेच आहे. Electric Vehicles मध्ये सर्वात महागडा पार्ट आहे, बॅटरी. मार्केटमध्ये Ola, Ather आणि TVS सारख्या कंपन्या आहेत. ग्राहकांसाठी त्यांनी एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक स्कूटर्स आणल्या आहेत.

बॅटरी जितकी सेफ आणि पावरफुल असेल, स्कूटरसोबत तितकी चांगली ड्रायविंग रेंज मिळेल. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेताना तुम्हाला काही गोष्टींची माहित असणं गरजेच आहे. तुम्ही जी स्कूटर विकत घेताय, त्यामध्ये स्कूटरच्या बॅटरीची वॉरंटी किती आहे?

Electric Scooter Battery Warranty : जाणून घ्या बॅटरी वॉरंटीबद्दल

Ola Scooter : ओला इलेक्ट्रिकची नवीन स्कूटर विकत घेणार असाल, तर तुम्हाला कंपनीकडून 8 वर्ष/80,000 km पर्यंत वॉरंटीचा फायदा मिळेल.

Ather Scooter : एथर कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्ष /30,000 km पर्यंत वॉरंटी दिली जाते. तुमची इच्छा असेल, तर तुम्ही वेगळा एथर बॅटरी प्रोटेक्ट प्लान खरेदी करु शकता. याने बॅटरीची वॉरंटी 5 वर्ष /60,000 km पर्यंत वाढेल.

TVS Scooter : टीवीएस कंपनीकडे सुद्धा बेस्ट सेलिंग मॉडल स्कूटर आहे. या स्कूटरच नाव आहे, TVS iQube. या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत 3 वर्ष/50,000 km पर्यंत वॉरंटी मिळते. तुम्ही स्कूटर विकत घेताना एक्सटेंडेड वॉरंटी घेत असाल, तर तुम्हाला 5 वर्ष/70,000 km पर्यंत बॅटरी वॉरंटीचा फायदा मिळेल.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा

इलेक्ट्रिक बाइक, स्कूटर किंवा कार यापैकी काहीही खरेदी करा, शोरुमच्या सेल्स अधिकाऱ्याकडून बॅटरी वॉरंटीची डिटेल माहिती जरुर घ्या. त्याशिवाय इलेक्ट्रिक व्हीकलसोबत एक्सटेंडेड वॉरंटीबद्दल नक्की विचारा. त्यामुळे तुम्हाला पुढची आणखी काही वर्ष बॅटरी वॉरंटी मिळेल.