मुंबई : आत्तापर्यंत लाखो लोकांनी ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बुक केली आहे आणि हे ग्राहक टेस्ट ड्राइव्ह आणि डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख भाविश अग्रवाल यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुढील आठवड्यापासून टेस्ट ड्राइव्ह सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर या स्कूटरची डिलिव्हरीदेखील सुरू होईल. (Ola Electric ceo shares Ola S1 test drive and delivery update)
सीईओ अग्रवाल यांनी ट्विटमध्ये 1 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, या व्हिडिओमध्ये स्कूटरची क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबतच स्कूटर जंप करतना पाहायला मिळते.
ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीची माहिती अद्याप दिलेली नाही. ओला इलेक्ट्रिकने सप्टेंबरमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 च्या विक्रीसाठी बुकिंग प्रक्रिया सुरू केली होती, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Ola Electric ने Ola S1 आणि Ola S1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत, जिथे Ola S1 ची किंमत 99,999 रुपये इतकी आहे, तर Ola S1 Pro ची किंमत 1.29 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.
एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
Having some fun with the scooter!
Test rides begin in the coming week and first deliveries begin soon after ?? pic.twitter.com/9YVFHpLwZw
— Bhavish Aggarwal (@bhash) November 7, 2021
इतर बातम्या
कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत
ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट
PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास
(Ola Electric ceo shares Ola S1 test drive and delivery update)