नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक स्कूटरने गेल्या काही दिवसांत चांगलीच कमाल केली आहे. या स्कूटरच्या विक्रीने मोठी उंची गाठली आहे. गेल्या दोन दिवसांत या नवीन कंपनीने ई-स्कूटरच्या विक्रीतून तब्ब्बल 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स कंपनीने नुकतेच एस1 आणि एस1 प्रो हे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाविश अग्रवाल यांनी यासंदर्भात शुक्रवारी सांगितले की, ओला एस 1 आणि एस 1 प्रोने गुरुवारी पहिल्या दिवशी 600 कोटी रुपयांची विक्री केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 500 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रम नोंदवला. (Ola electric scooter awesome, 1100 crore in two days)
भावीश अग्रवाल यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, त्यांच्या कंपनीने स्वत:चे रेकॉर्ड मोडले आहेत आणि फक्त 2 दिवसांत 1100 कोटी रुपयांची विक्रमी विक्री नोंदवली आहे. अग्रवाल यांच्या मते, ओला स्कूटरची पुढील विक्री 1 नोव्हेंबरला होईल. त्यामुळे ज्यांनी अद्याप ओला स्कूटर बुक केलेले नाही, ते आतापासून बुकींग करू शकतात. कंपनीच्या मते, ओला ई-स्कूटरची खरेदी विंडो आता बंद करण्यात आली आहे आणि 1 नोव्हेंबर रोजी ती विंडो पुन्हा उघडली जाईल.
खरेदीची विंडो बंद झाल्यानंतरही ग्राहक olaelectric.com वर भेट देऊन स्कूटर बुक करू शकतात. खरेदीची विंडो दिवाळीच्या अगोदर 1 नोव्हेंबर रोजी पुन्हा उघडली जाईल. या दुसऱ्या सेलमध्ये ओला एस 1 आणि एस 1 प्रोची विक्री केली जाईल. संपूर्ण दुचाकी उद्योगात एका दिवसात जितकी कमाई केली जाते, तितकी एकट्या ओला स्कूटरने केली आहे. यावरून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी किती वेगाने वाढली आहे हेदेखील सिद्ध झााले आहे.
यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी ओला इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी बाजारात दाखल होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण वेबसाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे तो मुहूर्त एक आठवड्याने पुढे ढकलण्यात आला. यासाठी ओलाने सर्वप्रथम आरक्षण सुरू केले, जे जुलै महिन्यात सुरू झाले. ज्यांनी आरक्षणादरम्यान आगाऊ बुकिंग केली होती, त्यांना या दोन दिवसांत ओला स्कूटर खरेदी करण्याची संधी देण्यात आली. त्याच दोन दिवसांत 1100 कोटींची कमाई झाली आहे.
ओला एस 1 ची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर एस 1 प्रोची किंमत 1,29,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांना हवे असल्यास ते केंद्र सरकारने सुरू केलेल्या फेम-2 सबसिडी आणि राज्य सरकारांनी दिलेल्या सबसिडीचा लाभ घेऊ शकतात. राज्यांनी त्यांच्या स्वत:च्या अनुदानाचे दर निश्चित केले आहेत, त्या आधारावर ओला स्कूटरची किंमत कमी केली जाईल. ओला स्कूटरची डिलिव्हरी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केली जाईल. ज्यांनी फ्लॅश सेलमध्ये स्कूटर खरेदी केली आहे, त्यांना कंपनी डिलीव्हरी करेल. ‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर स्कूटरची डिलीव्हरी केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. (Ola electric scooter awesome, 1100 crore in two days)
वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव, तिघांना बेड्या, कल्याणमध्ये वनविभागाची मोठी करवाईhttps://t.co/JwjRn5oPKE#ForestDepartment #Kalyan #KalyanCrime #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
इतर बातम्या
सांगलीत तहसील कार्यालयात रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच, परिसरात एकच खळबळ
Video | अंघोळीसाठी गेले, परत आलेच नाही, भीमा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू