मुंबई : ओला इलेक्ट्रिक स्कूटर अखेर आजपासून टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध होत आहे. तामिळनाडूस्थित EV मेकर कंपनी Ola S1 आणि Ola S1 Pro पहिल्यांदाच टेस्ट ड्राइव्हसाठी सादर करत आहेत. या वर्षी 15 ऑगस्ट रोजी ही स्कूटर लाँच करण्यात आली होती. तथापि, ही स्कूटर सर्व शहरांमध्ये उपलब्ध होणार नाही. आजपासून फक्त 4 शहरांमध्ये टेस्ट ड्राइव्ह सुरू होणार आहे. (Ola Electric scooter test drive begins, know who will get chance to drive)
एक निवेदन जारी करून ओला इलेक्ट्रिकने म्हटले आहे की, 10 नोव्हेंबरपासून ही टेस्ट ड्राईव्ह मोहीम निवडक शहरांमध्ये सुरू होईल आणि लवकरच ती देशभरात सुरू होईल. टेस्ट्र ड्राईव्हसाठी ग्राहकांना जवळच्या ओला टेस्ट कॅम्पमध्ये जाऊन स्लॉट्स बुक करावे लागतील. फायनल पेमेंटचा पर्याय आज ओपन होईल.
Ola Electric ची Ola S1 आणि Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर सध्या फक्त चार शहरांमध्ये टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध असेल, ज्यात दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि बंगळुरु या शहरांचा समावेश आहे. ज्या लोकांनी ओला इलेक्ट्रिकसाठी अॅडव्हान्स्ट पेमेंट केलं असेल त्यांनाच टेस्ट ड्राइव्हची संधी मिळेल.
Ola इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट घेण्यासाठी, ग्राहकांना काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असेल, ज्यासाठी ऑर्डर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि हेल्मेट आवश्यक असेल. ओला इलेक्ट्रिकने सल्ला दिला आहे की वापरकर्त्यांनी त्यांच्या स्लॉटवर बुकिंगच्या वेळेपेक्षा थोडे आधी पोहोचावे.
ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीची माहिती अद्याप दिलेली नाही. ओला इलेक्ट्रिकने सप्टेंबरमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 च्या विक्रीसाठी बुकिंग प्रक्रिया सुरू केली होती, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Ola Electric ने Ola S1 आणि Ola S1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत, जिथे Ola S1 ची किंमत 99,999 रुपये इतकी आहे, तर Ola S1 Pro ची किंमत 1.29 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.
एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
इतर बातम्या
कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत
ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट
PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास
(Ola Electric scooter test drive begins, know who will get chance to drive)