पेट्रोलच्या दरांमुळे ई-स्कूटर खरेदी करताय? ‘या’ पाच गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा…

| Updated on: Jul 21, 2022 | 3:33 PM

इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या माध्यमातून चांगली रेंज आणि परफ्रॉर्मेंसही मिळत आहे. दरम्यानच्या काळात इलेक्ट्रिक टू-व्हीलर्समध्ये आग लागण्याच्या घटना बघायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आता इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपन्याही सतर्क झाले असून त्यांच्याकडून सेफ्टीला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

पेट्रोलच्या दरांमुळे ई-स्कूटर खरेदी करताय? ‘या’ पाच गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा...
Follow us on

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Fuel costs) गगनाला भिडल्या आहेत. इंधनाचा वाढता खर्च पाहून सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. परंतु वाहनाशिवाय अनेकांना पर्याय नसतो, त्यामुळे आता लोक इंधनाला पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलर (E-scooter) सेगमेंट सध्या सर्वांच्या आशेचा किरण ठरत आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या माध्यमातून चांगली रेंज आणि परफ्रॉर्मेंसही (Performance) मिळत आहे. दरम्यानच्या काळात इलेक्ट्रिक टू-व्हीलर्समध्ये आग लागण्याच्या घटना बघायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आता इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपन्याही सतर्क झाले असून त्यांच्याकडून सेफ्टीला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. जर तुम्हीही इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदीच्या विचारात असाल तर, या लेखातील काही टीप्स तुमच्या कामी येउ शकतात.

4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 21 july 2022 -TV9

1) गर्मी नाही ‘या’ कारणाने धोका

नेहमी असं समजल जात, की इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये आग लागण्याच्या मागे गर्मीचं सिझन आहे. परंतु जास्तकरुन ईव्ही एक्सपर्ट्‌स आणि बॅटरी निर्मात्यांच्या मते, लिथिअम आयन सेल 130 डिग्री सेल्सिअरच्या वर तापमानाचा सामना करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्या आहेत. रिपोट्‌सनुसार, आग लागण्याचे मुख्य कारण बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आहे. बीएमएसमध्ये बॅटरी सेल्सला एक-दुसर्याच्या एकदम जवळ ठेवण्यात आल्याने त्यांना पाहिजे तेवढा स्पेस मिळत नाही; त्यामुळे आगीच्या घटना घडतात.

हे सुद्धा वाचा

2) स्वत: बॅटरी बनविणार्या ब्रँडची निवड करा

जास्तकरुन इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्या आपले प्रोडक्शनमध्ये दुसर्या देशांतून आणलेल्या बॅटरी लावत असतात. संबंधित बेटर्या त्या देशातील परिस्थिती लक्षात घेउन तयार करण्यात आलेल्या असतात. त्यामुळे भारतातील हवामानाला त्या बेटर्या योग्य ठरत नाहीत. त्यामुळे नेहमी असेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड्‌सची निवड केली पाहिजे, जे आपली बॅटरी स्वत: तयार करतात.

3) ट्रॅक रेकॉर्ड चेक करा

काही दिवसांपूर्वी सरकारने 7 हजारांपेक्षा अधिक ई-स्कूटर रिकॉल केल्या होत्या. यात ओकिनावा स्कूटर्स, प्योर ईव्ही ओला इलेक्ट्रिकच्या स्कूटर्सचा समावेश होता. यांना आग लागण्याच्या घटनांना लक्षात घेत पुन्हा बोलविण्यात आले होते. त्यामुळे नेहमी ईव्ही घेताना कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड तपासला पाहिजे.

4) सरकारी सर्टिफिकेशनची मागणी करावी

भारत सरकारने युरोपीय नियमांना पाहून आपल्या सर्टिफिकेट पॉलिसीला देखील अपडेट केले आहे. सध्याच्या AIS-156 टेस्टमध्ये व्हायब्रेशन थर्मल, मॅकेनिकल शॉक, आग आणि डस्टपासून वाचण्यासाठी टेस्टचा सहभाग आहे. यासोबतच ओव्हरचार्ज आणि ओव्हर डिस्चार्ज प्रोटेक्शनला देखील बघितले जात असते. यासाठी जेव्हाही नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करायचे असेल तेव्हा सरकारी प्रमाणित सर्टिफिकेशनचा आग्रह धरावा.

5) घरात चार्ज करणे टाळा

चार्जिंगशी निगडीत बाबींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर घरात चार्ज न करण्याचा सल्ला दिला जात असतो. चार्जिंग करण्यासाठी फारशी सोय नसल्याने लोक घरात बॅटरी चार्ज करीत असतात. जर तुमच्या ईव्हीची बॅटरी रिमूव्हेबल असेल तर तिला बाहेर काढून घराच्या बाहेरच चार्ज केली पाहिजे.