मुंबई : भारतासह जगभरातील बहुतांश वाहन कंपन्या सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहेत. जिथे कारपासून बस आणि ट्रकपर्यंत इलेक्ट्रिक वाहने विकसित केली जात आहेत. सध्या भारतात इसुझू डी मॅक्स व्ही क्रॉस (Isuzu d max v cross) हा पिकअप ट्रक उपस्थित आहे, तर टोयोटा हिलक्स (Toyota Hilux) देखील काही दिवसांनी बाजारात उपलब्ध होणार आहे. पण आता यांसारख्या मिनी ट्रकला टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रिक मिनी ट्रक (Electric mini Truck) येत आहे. यामुळे ट्रक प्रदूषण होणार नाही आणि युजर्सचा पेट्रोल-डिझेलवरील खर्चदेखील कमी होण्यास मदत होईल. रिव्हियान (Rivian) कंपनी मिनी पिकअप इलेक्ट्रिक ट्रक घेऊन येत आहे. या ट्रकचा अधिकृत व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याचे फीचर्स सादर करण्यात आले आहेत.
Rivian चा इलेक्ट्रिक ट्रक R1T हा आकर्षक आहे. कंपनीने त्याचा अधिकृत व्हिडिओ देखील जारी केला आहे, जो त्याची ड्रायव्हिंग क्षमता दर्शवतो. या मिनी ट्रकमध्ये 8 ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत, जे युजर्सच्या सोयीसाठी डिझाइन केले गेले आहेत, त्यापैकी चार रस्त्यासाठी आहेत आणि इतर चार ऑफ-रोडिंगसाठी आहेत. रिव्हियानने आपल्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये या कारचे 8 मोड दाखवले आहेत.
इतर बातम्या
Budget 2022: केंद्र सरकार EV चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करणार!
Maruti Ertiga ला टक्कर देणारी Kia ची नवी कार या महिन्यात लाँच होणार, काय असेल खास?
Kia ते Toyota, पाहा पुढील दोन महिन्यांत भारतात लाँच होणाऱ्या गाड्या