रॉयल एनफिल्डची मजाच काही वेगळी आहे. बाईक घ्यायची तर रॉयल एनफिल्ड हीच घ्यावी, अशी चर्चाही तरुण मंडळींमध्ये असते. पण, याला टक्कर देणारी किंवा प्रतिस्पर्धी बाईक तुम्हाला माहिती आहे का? हे सांगण्याचं कारण म्हणजे या बाईकवर आता तुम्हाला चांगले गिफ्ट मिळू शकतात.
बाईकर्स आणि रोड ट्रॅव्हलर्समध्ये रॉयल एनफिल्ड हिमालयनची जबरदस्त प्रतिस्पर्धी बाईक देखील भारतीय बाजारात आहे. तसेच यात 400 सीसीपर्यंतचे दमदार इंजिन देण्यात आले आहे. आता या बाईकसोबत कंपनी 12,500 रुपयांच्या वस्तू मोफत देत आहे.
ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स (Triumph Scrambler 400 X) बाईक दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. बजाज ऑटो या बाईकची निर्मिती भारतात करते. या बाईकमुळे आता हजारो रुपयांच्या वस्तू मोफत मिळतात.
फ्री अॅक्सेसरीजबद्दल बोलायचे झाले तर ‘ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’सोबत ग्राहकांना आता 12,500 रुपयांच्या अॅक्सेसरीज पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. हे बाईकच्या खरेदी किंमतीत समाविष्ट केले जाईल आणि त्यांच्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे कोणतेही पॅकेज घ्यावे लागणार नाही किंवा कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या बाईक ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्सचे परवडणारे व्हर्जन तयार करत आहे. हे नुकतेच रोड टेस्टिंगदरम्यान दिसून आले आहे. या बाईकमध्ये साधे तंत्रज्ञान आणि नवे इंजिन पाहायला मिळते. नव्या बाईकच्या लाँचिंगची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
‘ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’मध्ये आता लोअर इंजिन बार, हाय मडगार्ड किट, एक छोटी फ्लाय स्क्रीन, टँक पॅड, रियर लगेज रॅक आणि टॉप बॉक्स बेस प्लेट मोफत देण्यात आली आहे. उर्वरित बाईकमध्ये इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे तीन रंग पांढरा, लाल आणि मॅट ग्रीन रंगात आहेत.
ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’मध्ये ग्राहकाला 400 सीसी इंजिन मिळते. ट्रायम्फमधील ही सर्वात महागडी 400 सीसीची बाईक आहे. याचे इंजिन 40 एचपीपॉवर आणि 37.5 न्यूटनचा टॉर्क जनरेट करते. यात 19/17 इंचाचा व्हील सेट देण्यात आला आहे. याची एक्स शोरूम किंमत 2.64 लाख रुपये आहे.
लक्षात घ्या की, ‘ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’सोबत ग्राहकांना 12,500 रुपयांच्या अॅक्सेसरीज पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. त्यामुळे हा तुमचा फायदा होऊ शकतो.