भारतीय बाजारपेठेत आता कारच्या सुरक्षिततेकडे खूप लक्ष दिले जात आहे. नवीन कार खरेदी करताना कारला किती स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, हेही ग्राहकांना जाणून घ्यायचे असते. अपघात झाल्यास त्यात बसलेले प्रवासी किती सुरक्षित असतील, हे गाडीच्या सेफ्टी रेटिंगवरून दिसून येते. 5 स्टार रेटिंग म्हणजे ही सर्वात सुरक्षित कार आहे. आम्ही तुम्हाला एका परवडणाऱ्या कारबद्दल सांगणार आहोत जी 6 लाखांपेक्षा कमी किंमतीत फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देते. म्हणजेच फाइव्ह स्टार रेटिंग देणारी ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे.
आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती टाटा पंच (Tata Punch) आहे. ही कंपनीची मायक्रो एसयूव्ही आहे, याची किंमत फक्त 6 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये बाजारात लाँच केले होते. त्यानंतर लगेचच या कारचे सेफ्टी रेटिंग समोर आले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये टाटा पंचला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. प्रौढ लोकांच्या संरक्षणात त्याला 17 पैकी 16.45 गुण मिळाले. तर लहान मुलांच्या संरक्षणासाठी त्याला 49 पैकी 40.98 गुण मिळाले. टाटा पंचमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकरेज आणि एबीएस स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. नेक्सॉन आणि अल्ट्रोजनंतर 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी टाटा पंच ही कंपनीची तिसरी कार आहे.
टाटा पंचमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 1 पीएस पॉवर आणि 2 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअलसह 5 स्पीड AMT गियरबॉक्स देण्यात आला आहे. लवकरच त्यात CNG सुविधाही जोडली जाणार आहे. टाटाच्या या मायक्रो एसयूव्हीची ग्राऊंड क्लिअरन्स 187 mm आहे.