मुंबई : भारतात नवीन कारसह (New car) सेकंड हँड कारचा बाजारदेखील तेजीत आला आहे. कोरोना काळानंतर तर कारला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. ज्या वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. त्या वेळी खासगी वाहनांचा मोठा आधार मिळाला. कोरोना काळात सर्वाधिक सेकंड हँड चारचाकी (Second hand car) वाहने विकली गेलीत. जर तुम्हीदेखील सेकंड हँड कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी आवर्जुन वाचा जर तुम्हाला कमी किमतीत चांगल्या कंडीशनमधील व चांगला मायलेज (Mileage) देणारी कार पाहिजे असेल तर तूमच्यासमोर आज आम्ही काही कारचे पर्याय देणार आहोत.
मारुती सुझुकी ट्रॅव्हल व्हेल्यू डॉट कॉम या वेबसाइटवर एक सेकंड हँड मारुती अल्टो 800 विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे 2017 चे मॉडेल आहे. ही कार केवळ 75 हजार किमी चालली असून या कारवर एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. याशिवाय 3 सर्व्हिसिंगही फ्री देण्यात आल्या आहे. या कारची किंमत केवळ 75 हजार रुपये आहे.
मारुतीची ही अल्टो कार एलएक्सआय व्हेरिएंटवर आधारीत आहे. ही ओला कार्सवर रजिस्टर करण्यात आलेली आहे. 2015 चे मॉडेल असून केवळ 58 हजार किमी चालली आहे. पेट्रोल इंजीन असलेल्या या कारची किंमत ओला कार्सवर केवळ 2.33 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
ही कार ओला कार्सवर लिस्टेड आहे. हे 2013 चे मॉडेल असून आतापर्यंत 56 हजार किमी चालली आहे. याची किंमत 2.21 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
ह्युंडाईची आय10 इरा ओला कार्सवर लिस्टेड आहे. हे 2013 चे मॉडेल असून आतापर्यंत 53 हजार किमी चालली आहे. हे एक पेट्रोल मॉडेल असून एक लाखांच्या डिस्काउंटवर केवळ 2.62 लाखांना उपलब्ध आहे.
ही कारदेखील ओला कार्सवर लिस्टेड आहे. हे 2011 चे पेट्रोल इंजीन मॉडेल असून कार केवळ 42569 किमी चालली आहे. या कारची किंमत 219999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार तूम्ही महिन्याला केवळ 3915 रुपयांच्या ईएमआयवरही खरेदी करु शकतात.