60KM टॉप स्पीड, 150 किमी रेंजसह मेड इन इंडिया इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर लाँच, जाणून घ्या दुचाकींची खासियत

| Updated on: Jan 01, 2022 | 6:14 PM

शेमा इलेक्ट्रिक या ओदिशामधील युवा मेक-इन इंडिया ईव्ही उत्पादक कंपनीने ईव्ही इंडीया एक्स्पो 2021 मध्ये आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या आकर्षक श्रेणीचे सादरीकरण केले.

60KM टॉप स्पीड, 150 किमी रेंजसह मेड इन इंडिया इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर लाँच, जाणून घ्या दुचाकींची खासियत
Shema Electric Unveiled Two New Electric Two-Wheelers
Follow us on

मुंबई : शेमा इलेक्ट्रिक या ओदिशामधील युवा मेक-इन इंडिया ईव्ही उत्पादक कंपनीने ईव्ही इंडीया एक्स्पो 2021 मध्ये आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या आकर्षक श्रेणीचे सादरीकरण केले. प्रसिद्ध ईव्ही एक्स्पो 2021 च्या मंचावर या ब्रँडला त्यांच्या एसईएस टफ (हाय स्पीड) आणि एसईएस हॉबी (लो स्पीड) यांच्या शुभारंभानंतर ब्रँडचे अनेक दर्शकांनी कौतुक केले. तसेच, लो स्पीड व्हेरिएंटमधील त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण उपलब्ध रेंज- एसईएस झूम, एसईएस बोल्ड, एसईएस ईगल आणि एसईएस टफ या रेंजमधील उत्पादनांचेही त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि शैलीदार डिझाईन यामुळे उपस्थित लोकांनी कौतुक केले. (Shema Electric Unveiled Two New Electric Two-Wheelers At EV India Expo 2021)

एसईएस टफ (SES Tuff – हाय स्पीड) : बीटूबी प्रकारासाठी हाय स्पीड दुचाकी ब्रँडने समोर आणली आहे. ह्या बहुउपयोगी इलेक्ट्रीक बाईकचं टॉप स्पीड 60 किमी प्रति तास असेल आणि ती 150 किलो वजनसह 150 किमीची रेंज देऊ शकते. एसईएस टफला एक ड्युअल 60 व्ही 30 एएच लिथियम डिटॅचेबल बॅटरीने सक्षम केलेले आहे.

एसईएस हॉबी (SES Hobby – लो स्पीड) : या ब्रँडचे हे दुसरे उत्पादन 100% भारतीय बनावटीची ई- स्कूटर एसईएस हॉबी हे आहे. त्यामध्ये 25 किमी/ तास ही सर्वाधिक गती मिळते व सिंगल चार्जवर ती 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. आकर्षक शैली आणि उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह या उत्पादनाचे उपस्थितांनी कौतुक केले. एसईएस हॉबीमध्ये 60 व्ही आणि 30 एएच डिटॅचेबल बॅटरी आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. सध्या ब्रँडची लो स्पीड ई स्कूटर व्हेरिएंटमध्ये 5 उत्पादने आहेत व हाय स्पीड फेम- II प्रकारातील उत्पादन आहे.

अजून 3-4 गाड्या लाँच करणार

या नवीन उत्पादनाच्या शुभारंभाबद्दल बोलताना, शेमा इलेक्ट्रीकचे संस्थापक आणि सीओओ योगेश कुमार लाथ म्हणाले की, “भारतामध्ये ईव्ही मार्केट नवीन आहे आणि देशाने या बाबतीत खूप मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत. ते साध्य करण्यासाठी सर्व घटकांनी सर्वंकष विकासासाठी सक्रिय प्रकारे त्यत सहभाग घेतला पाहिजे. आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन सकारात्मक प्रकारे ईव्ही दुचाकींचे उत्पादन करत आहोत. आम्ही या उत्पादनांमध्ये नावीन्यपूर्णता आणणे व त्यांना आणखी प्रगत करणे सुरू ठेवू व दुसऱ्या बाजूला आमच्या आउटरीचमध्येही विस्तार करू. या आर्थिक वर्षाच्या शेवटी आम्ही बाजारामध्ये 2-3 नवीन हाय स्पीड उत्पादने लाँच करू आणि पूर्ण भारतामध्ये आमचे 100 पेक्षा जास्त वितरक असतील.”

योगेश कुमार म्हणाले की, “शेमा इलेक्ट्रिकचे सध्या 75 वितरक आहेत व या ब्रँडची 13 राज्यांमध्ये उपस्थिती‌ आहे. भारतातील सर्वांत प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजस्थान, पंजाब, हरयाना, केरळ, कर्नाटक, गुजरातमध्ये पुढील 6 महिन्यांमध्ये आम्ही आणखी खोलवर जाण्याचे आमचे उद्दिष्ट आहे”.

इतर बातम्या

Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत

भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या, जाणून घ्या टॉप 5 कार्सच्या किंमती आणि फीचर्स

(Shema Electric Unveiled Two New Electric Two-Wheelers At EV India Expo 2021)