सिंपल एनर्जी (Simple Energy) ने फ्लॅगशिप स्कूटर सिंपल वन (Simple One) चे पावरट्रेन मध्ये अपग्रेड करण्याबाबतची घोषणा केली आहे.नवीन मोटर स्कूटर ही पावर आउटपुटला वाढवणारी आहे. नवीन अपग्रेड या स्कूटरला संपूर्ण प्रोडक्ट सेगमेंट मध्ये सर्वात शक्तिशाली पावरट्रेन मधील एक बनवू शकतो. नव्या मोटरची घोषणा सिंपल एनर्जी चे सीईओ सुहास राजकुमार यांनी केली आहे. EV निर्माता यांनी दावा केला आहे की, ही नवीन मोटर नवीन मोटर फक्त तिचा परफॉर्मेंसच वाढवणार नाही तर गाडीची एफिशिएंसी मध्ये सुद्धा बदल आणेल आणि उत्तम थर्मल मॅनेजमेंट ऑफर करेल. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) ची डिल्हीवरी जून महिन्या पर्यंत केली जाईल.नवीन मोटर आधी बाजारात उपलब्ध असणाऱ्या यूनिटचे अपग्रेडेशन आहे. सिंपल एनर्जी यांनी असा दावा केला आहे कि ही मोटर 72 एनएम चे टार्क जनरेट करू शकते. कंपनी ने असा ही दावा केला आहे कि ही मोटर इंडस्ट्री मधील सर्वात जास्त आणि लहान फॉर्म मध्ये सुद्धा उपलब्ध करता येऊ शकते. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 4.8 kWh बॅटरी पॉवर आहे.भारतीय ईवी निर्माता यांनी दावा केला आहे की,नवीन अपग्रेड 200+ किमी पर्यंत रेंज देऊ शकेल.
या मोटर मध्ये हाय लेवलचे वर्टिकल इंटीग्रेशन असेल जे बदल्यात इलेक्ट्रिक स्कूटरला 96% ची उत्तम एफिशिएंसी देईल. सिंपल एनर्जीने असे सांगीतले आहे की, मोटरला इन-हाउस डेवलप केल्याने भविष्यात उत्पादनाच्या निर्मितीत वाढ दिसून येईल. सिंपल एनर्जी ने नवीन मोटरचा पेटेंट देखील नोंदविला आहे आणि या मोटरला भारतात बनवले गेले आहे.
सिंपल वन ईको मोड मध्ये 200 किमी पेक्षा जास्त ड्राइविंग रेंज मिळेल असे कंपनी द्वारे सांगण्यात येत आहे. कंपनी च्या मते 2.85 सेकेंद मध्ये स्कूटर 0-40 किमी प्रति तासाच्याव रफ्तारमध्ये धावू शकते. टॉप स्पीड 105 किमी प्रति तास पर्यंत लिमिटेड आहे. बूट कॅपासिटी 30 लीटर आहे आणि यांत 8.5 kW ची मोटर देखील मिळेल. ही मोटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,947 रुपये मध्ये बुकिंग कीमत वर simpleenergy.in या लिंक वर जाऊन इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात. सिंपल एनर्जी ने असे देखील सांगितले आहे की, जून नंतर या मोटरचे लॉन्चिंग केले जाईल. कंपनी ने एडिशनल अपग्रेड आणि सरप्राइज चे सुद्धा वचन दिले आहे,ज्याची घोषणा येणाऱ्या आठवड्यामध्ये केली जाईल.
सिंपल वनचे प्रोडक्शन तामिळनाडू येथील होसुर मध्ये स्थित असलेली कंपनी मैन्युफैक्चरिंग यूनिटच्या के फेज 1 मध्ये केले जाईल. मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची एनुअल कॅपेसिटी 1 मिलियन यूनिट पर्यंत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की फॅक्टरी नवीन निर्मिती करण्यासाठी सज्ज होत आहे आणि लवकरच येणार या आठवड्यामध्ये ही कंपनी चालू होऊन जाईल कंपनीने तामिळनाडूमध्ये धर्मपुरी येथे एक दुसरा प्लांट सुद्धा सुरू केलेला आहे जो 600 एकर परिसरामध्ये उभारण्यात आलेला आहे आणि याची क्षमता वार्षिक 12.5 मिलियन युनिट असेल.
संबंधित बातम्या
Mumbai Crime : मालाडमध्ये बोगस डॉक्टरला अटक, मयत डॉक्टरच्या नावाने चालवत होता क्लिनिक