मुंबई : स्कोडा कुशाक (Skoda Kushaq) ही कार जून 2021 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली होती आणि फॉक्सवॅगन टायगुन (Volkswagen Taigun) सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. या दोन्ही SUV MQB A0 IN प्लॅटफॉर्म शेअर करतात आणि या दोन्ही गाड्या भारतातील त्यांच्या संबंधित ब्रँडचे सर्वोत्तम विक्री होणारे मॉडेल बनण्याच्या मार्गावर आहेत. कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे Skoda आणि VW ने भारतीय बाजारपेठेत या SUV च्या किमती वाढवल्या आहेत. (Skoda Kushaq and Volkswagen Taigun price increased in India, know all variants new prices)
2021 Volkswagen Tiguan ही कार आज 32 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आली होती ही पाच सीटर एसयूव्ही फोक्सवॅगनच्या भारत 2.0 धोरणाचा भाग आहे. नवीन प्रीमियम SUV फोक्सवॅगनच्या MQB प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जी ऑटोमेकरने ऑफर केलेल्या इतर अनेक मॉडेल्ससारखीच आहे.
नवीन जनरेशन Tiguan SUV काही उल्लेखनीय बदलांसह बाजारात दाखल झाली आहे. प्रीमियम SUV मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे बदल महत्त्वाचे असू शकतात. हे नवीन मॉडेल फक्त पेट्रोल व्हेरिएंटमध्ये येईल आणि 2.0 लीटर फोर-सिलेंडर टर्बो-पेट्रोल मोटर इंजिनद्वारे सुसज्ज आहे. हे इंजिन 190hp पॉवर आउटपुट आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीने इंजिनला 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडले आहे. फोक्सवॅगनची 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम या SUV साठी स्टँडर्ड म्हणून येईल.
ही कार कंपनीच्या MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर आधारित असेल Skoda Slavia ची लांबी 4,541 mm, रुंदी 1,752 mm आणि उंची 1,487 mm आहे. स्कोडा रॅपिडच्या तुलनेत, ऑल-न्यू स्लाव्हिया 128 मिमी लांब, 53 मिमी रुंद आणि 21 मिमी लांब आहे. Skoda आणि Volkswagen ने भारत 2.0 प्रकल्पाचा भाग म्हणून एक अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि परिणामी, कंपनी भारतात नवनव्या कार्सचा धडाका सुरु करणार आहे. VW देखील 2022 मध्ये व्हेंटोच्या जागी Vertus-आधारित सेडान सादर करेल.
Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर या कारला नाव आणि ओळख मिळाली आहे. कंपनीने या कारला स्कोडा कुशक (Skoda Kushaq) असं नाव दिलं आहे. कंपनीने कुशक हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. कुशक या शब्दाचा अर्थ आहे शासक, सम्राट किंवा राजा. ही व्हीकल मार्केटमध्ये ह्युंदाय क्रेटा आणि किया सेल्टॉस या गाड्यांना टक्कर देणार आहे. या मॉडेलचं लेटेस्ट अपडेट कंपनीने सादर केलं आहे. ही कार फोक्सवॅगन ग्रुपच्या ‘इंडिया 2.0’ प्रोजेक्टअंतर्गत तयार करण्यात आलेली पहिली कार आहे.
दरम्यान, स्कोडा ऑटो इंडियाने त्यांच्या आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्ही, स्कोडा कुशकच्या इंटीरियरचे डिझाईन स्केच जाहीर केले. मध्यभागी इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि 2021 स्कोडा सुपर्बमध्ये दिसणारे स्टायलिश 2-स्पोक स्टीयरिंग व्हीलचा समावेश करण्यात आला आहे. या कारच्या केबिनचे मुख्य आकर्षण 10 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन असेल, जी Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारख्या फीचर्ससह मिळेल. कुशक एका मोठ्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठ्या एअर-कॉन व्हेंट्ससह, प्रशस्त केबिनसह येईल.
कंपनीने अद्याप या कारच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. ही कार भारतीयांना परवडणारी असेल, असं म्हटलं जात आहे. नुकतीच या कारची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. या शानदार SUV च्या प्रोडक्शन मॉडलची एक झलक स्केचच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. कंपनीने नुकतचं या कारचं एक स्केच जारी केलं आहे. ज्यामध्ये या कारचं डिझाईन पाहायला मिळालं.
भारतीय बाजारात स्कोडा कुशकचं जे डिझाईन सादर झालं आहे, हे डिझाईन 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केलेल्या स्कोडा व्हिजन इन कॉन्सेप्टवरुन प्रेरणा घेत बनवलं आहे. या डिझाईनवरुन लक्षात येतंय की, या कारच्या पुढच्या भागात दोन भागांमध्ये विभागलेल्या हेडलाईट्स मिळतील. अंडरराईड सुरक्षा असलेलं बम्पर या एसयूव्हीला अॅथलेटिक लुक प्रदान करतं. कारचं बोनेटही जबरदस्त दिसेल असंच डिझाईन करण्यात आलं आहे. कारचं प्रोफाईल तुम्हाला कारोक आणि कोडियाकच्या डिझाईनची आठवण करुन देतं.
इतर बातम्या
Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी
i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती
(Skoda Kushaq and Volkswagen Taigun price increased in India, know all variants new prices)