Skoda Slavia Sedan चा 18 नोव्हेंबरला डेब्यू, Honda City – Hyundai Verna ला टक्कर

| Updated on: Nov 14, 2021 | 12:33 PM

Skoda Auto India ने18 नोव्हेंबर 2021 रोजी स्लाव्हिया सेडानचा (Skoda Slavia Sedan) जागतिक प्रीमियर आयोजित केला आहे. स्लाव्हियाला रॅपिडच्या तुलनेत थोडासा प्रीमियम दिला आहे कारण त्यात हल्लीच्या तुलनेत अपमार्केट फीचर्स आहेत.

Skoda Slavia Sedan चा 18 नोव्हेंबरला डेब्यू, Honda City - Hyundai Verna ला टक्कर
Skoda Slavia Sedan
Follow us on

मुंबई : Skoda Auto India ने18 नोव्हेंबर 2021 रोजी स्लाव्हिया सेडानचा (Skoda Slavia Sedan) जागतिक प्रीमियर आयोजित केला आहे. 90% पेक्षा जास्त लोकल कंटेंटसह MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आलेले हे कंपनीचे तिसरे मॉडेल असेल. स्लाव्हियाला रॅपिडच्या तुलनेत थोडासा प्रीमियम दिला आहे कारण त्यात हल्लीच्या तुलनेत अपमार्केट फीचर्स आहेत. (Skoda mid-size sedan SLAVIA to launch on 18 November; know details)

Skoda Slavia Sedan कंपनीच्या Skoda Rapid ला रिप्लेस करेल. स्कोडाची ही नवीन कार अनेक चांगल्या फीचर्ससह सादर केली जाईल. कंपनीने अद्याप याबद्दल तपशीलवार माहिती दिलेली नाही, परंतु अनेक लीक्समध्ये या कारचे फीचर्स समोर आले आहेत. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, नवी Slavia भारतीय बाजारात होंडा सिटी आणि ह्युंडई वेर्ना या गाड्यांना दोरदार टक्कर देईल.

Skoda आणि Volkswagen ने भारत 2.0 प्रकल्पाचा भाग म्हणून एक अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि परिणामी, कंपनी भारतात नवनव्या कार्सचा धडाका सुरु करणार आहे. VW देखील 2022 मध्ये व्हेंटोच्या जागी Vertus-आधारित सेडान सादर करेल. स्कोडा स्लाव्हिया MQB हे A0 IN आर्किटेक्चरवर बसणारे तिसरे मॉडेल आहे आणि मध्यम आकाराच्या सेडान Honda City आणि Hyundai Verna शी स्पर्धा करेल.

दमदार इंजिन

Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन मिळेल.

Skoda Slavia चे फीचर्स

Skoda च्या आगामी कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Skoda mid-size sedan SLAVIA to launch on 18 November; know details)