मुंबई : स्कोडा (Skoda) ही ऑटो कंपनी भारतीय बाजारपेठेत आपली नवीन स्लाव्हिया (Skoda Slavia) मिड-साइज प्रीमियम सेडान मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घोषणा केल्याप्रमाणे, नवीन स्लाव्हिया मॉडेलची भारतीय बाजारातील किंमत 28 मार्च रोजी जाहीर केली जाईल. स्कोडाने नवीन स्लाव्हियाच्या डिलिव्हरीची तारीख देखील जाहीर केली आहे. स्कोडा स्लाव्हियाच्या नवीन मॉडेलचे बुकिंग सुरू झाले आहे. स्लाव्हिया मॉडेलचे बुकिंग शुल्क 11 हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील चाकण प्लांटमध्ये कारचे उत्पादन केले जात आहे. भारतीय बाजारपेठेत स्लाव्हियाचे नवीन मॉडेल होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाझ आणि ह्युंडई वेर्ना (Hyundai Verna) या गाड्यांना टक्कर देईल. ज्या ग्राहकांनी ही कार बुक केली आहे त्यांच्यासाठी 28 फेब्रुवारीपासून या कारची डिलीव्हरी सुरु केली जाईल.
स्कोडा ऑटो इंडिया ब्रँडचे (Skoda Auto India) संचालक जॅक हॉलिस यांनी 28 मार्च रोजी नवीन स्कोडा स्लाव्हिया मॉडेलचे लाँचिंग होणार असल्याची घोषणा केली आहे. नवीन स्लाव्हिया मॉडेल 1.0L TSI पेट्रोल आणि 1.5L TSI पेट्रोल इंजिन या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. 1.0-लिटर मॉडेल 28 तारखेला आणि 1.5-लीटर मॉडेल 3 मार्च रोजी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
Deliveries of the 1.0TSi will start from 28th of February and 1.5FTS from 3rd of March.
— Zac Hollis (@Zac_Hollis_) February 20, 2022
स्लाव्हिया हे कंपनीच्या लोकलाइज्ड MQB A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित दुसरे मॉडेल आहे. याआधी कंपनीने स्कोडा कुशाक (Skoda Kusahq) कॉम्पॅक्ट SUV कार या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. स्लाव्हियाचे उत्पादन स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या महाराष्ट्रातील चाकण प्लांटमध्ये केले जाईल आणि कार 95 टक्के लोकलायजेशनसह येईल. स्लाव्हिया भारतीय बाजारपेठेला नजरेसमोर ठेवून विकसित करण्यात आल्याचे स्कोडाचे म्हणणे आहे. स्कोडाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्लाव्हियावरुन पडदा हटवला होता. लॉन्च केल्यावर, ही कार Honda City, Hyundai Verna, Maruti Suzuki Ciaz आणि मिडसाईज सेडान सेगमेंटमधील इतर कारशी स्पर्धा करेल. स्कोडा स्लाव्हियाची किंमत 10 लाख रुपये ते 17 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.
Skoda Slavia ची लांबी 4,541 mm, रुंदी 1,752 mm आणि उंची 1,487 mm आहे. स्कोडा रॅपिडच्या तुलनेत, ऑल-न्यू स्लाव्हिया 128 मिमी लांब, 53 मिमी रुंद आणि 21 मिमी लांब आहे. Skoda आणि Volkswagen ने भारत 2.0 प्रकल्पाचा भाग म्हणून एक अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि परिणामी, कंपनी भारतात नवनव्या कार्सचा धडाका सुरु करणार आहे. VW देखील 2022 मध्ये व्हेंटोच्या जागी Vertus-आधारित सेडान सादर करेल.
Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन मिळेल.
Skoda च्या आगामी कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.
इतर बातम्या
आता इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरी रिसायकल होणार, Ford आणि Volvo ने सुरु केली स्टार्टअप कंपनी
BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?