मुंबई : Suzuki Bike India Pvt Ltd ने भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एक नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर Suzuki 125 चे नवीन कलर व्हेरियंट आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये मेटॅलिक डार्क ग्रीनिश ब्लू आणि मेटॅलिक मॅट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. याशिवाय, सुझुकी 125 च्या राइड कनेक्ट एडिशनला ग्लॉसी ग्रे कलर ऑप्शनमध्ये वेल्ड केले गेले आहे. नवीन रंगाच्या पर्यायाशिवाय या स्कूटरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (Suzuki Access 125 scooter new color variant launched in India)
Suzuki Access 125 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये Access 124 cc BS6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6750 rpm वर 8.6 bhp पॉवर जनरेट करते, तर 5500 rpm वर 10 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये साइड स्टँड इंटरलॉकिंग फीचर देण्यात आले आहे, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने एक खास फीचर आहे.
या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाल्यास सुझुकी अॅक्सेस 125 BS6 मध्ये समोरच्या बाजूला डिस्क ब्रेकिंग सिस्टीम आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. याच्या सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाल्यास Access 125 BS6 मध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला स्विंग आर्म सस्पेन्शन दिले आहे.
Suzuki Access 125 च्या कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर पर्ल सुझुकी डीप ब्लू, मेटॅलिक मॅट प्लॅटिनम सिल्व्हर, पर्ल मिराज व्हाईट, ग्लास स्पार्कल ब्लॅक आणि मेटॅलिक मॅट फायब्रॉन ग्रे सारख्या 5 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. मात्र, ही स्कूटर विक्रीसाठी कधी उपलब्ध होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
सुझुकी 125 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर 68,800 ते 73,400 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. BS6 Access 125 भारतीय बाजारपेठेत जानेवारी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. यानंतर, BS6 Suzuki Access 125 ची किंमत 1,700 रुपयांनी वाढवण्यात आली.
इतर बातम्या
Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती
Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…
(Suzuki Access 125 scooter new color variant launched in India)