Dhoom सिनेमात जॉनने वापरलेली Hayabusa बाईक भारतात परतणार, स्पीडचा रेकॉर्ड किती?

| Updated on: Jan 29, 2021 | 7:28 PM

जगभरातील मोटारसायकलप्रेमींसाठी सुझुकीने (Suzuki) खुशखबर दिली आहे. (Suzuki Hayabusa all set to return)

Dhoom सिनेमात जॉनने वापरलेली Hayabusa बाईक भारतात परतणार, स्पीडचा रेकॉर्ड किती?
दमदार पावरसह सुझुकी हयाबुसा पुन्हा एकदा बाजारात
Follow us on

मुंबई : जगभरातील मोटारसायकलप्रेमींसाठी सुझुकीने (Suzuki) खुशखबर दिली आहे. आयकॉनिक सुझुकी हायाबुसा (Suzuki Hayabusa) ही बाईक मार्केटमध्ये परतणार आहे. हायाबुसा जगातील पहिली अशी बाईक आहे जी 300 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. एक काळ असा होता, जेव्हा भारतीय रायडर्स या बाईकवर प्रचंड प्रेम करत होते. कारण ही बाईक धूम (Dhoom) या 2008 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटात वापरण्यात आली होती. (Suzuki Hayabusa all set to return in global and Indian Market)

‘धूम’ या चित्रपटात जॉन अब्राहमने कबीर नावाच्या एका चोराची भूमिका साकारली होती. कबीरने या बाईकच्या मदतीने अनेक चोऱ्या केल्या होत्या. ही बाईक खूप वेगाने धावू शकते त्यामुळे या चित्रपटातील चोर चोरी करुन पोलिसांच्या हाती पकडले जाऊ नये म्हणून या बाईकच्या मदतीने पळून जायचे. धूम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्ष भारतीयांमध्ये या बाईकची मोठी क्रेझ होती.

पूर्वी ही बाईक भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होती. परंतु काही कारणास्तव कंपनीने भारतात या बाईकची विक्री करणं बंद केलं. त्यामुळे भारतीय रायडर्स खूप निराश झाले होते. परंतु आता ही बाईक भारतात परतणार असल्याने पुन्हा एकदा रायडर्समध्ये या बाईकबाबत उत्सूकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांच्या कंपनीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जपानी मोटारसायकल निर्माती कंपनी सुझुकीने नुकताच एक टीझर व्हिडीओ शेअर करत या बाईकबाबत काही माहिती सादर केली होती.

टीझरमध्ये सादर केलेले फिचर्स

या बाईकबाबत माहिती देणारा टीझर कंपनीने लाँच केला आहे. तसेच काही लीक्सद्वारे या बाईकबाबत, तिच्या फिचर्सबाबत माहिती समोर आली आहे. लीक्सद्वारे मिळालेल्या माहितीनुसार या बाईकचा लुक पूर्वीसारखाच असेल परंतु यामधील काही फिचर्स अपग्रेड केले जाणार आहेत. यामध्ये तुम्हाला नवीन इनस्ट्रूमेंट क्लस्टरही मिळेल. बाईक टॅकोमीटर आणि स्पीडोमीटरसह लाँच केली जाणार आहे. तसेच यामध्ये एक डिजीटल स्क्रीनही दिली जाऊ शकते. टीझर व्हिडीओमध्ये ही बाईक LED DRLs सह दिसत आहे.

या बाईकमध्ये तुम्हाला LED हेडलँप्सही मिळू शकतात. पॉवरट्रेनबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनी या गाडीमध्ये नवीन इंजिन देऊ शकते. जे पुर्वीपेक्षा अधिक दमदार असेल, ज्यामध्ये अधिक पॉवर आणि टॉर्क सपोर्ट असेल.

कंपनीने सादर केलेल्या टीझर व्हिडीओमध्ये ही बाईक 300 किमी प्रति तास इतक्या वेगाला स्पर्श करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही बाईक 5 फेब्रुवारीला लाँच केली जाऊ शकते. ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केल्यानंतर ही बाईक भारतात लाँच केली जाईल. दरम्यान ही बाईक भारतात कधी लाँच केली जाणार याबाबत अद्याप कंपनीकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा

सर्वात स्वस्त तीन कार्सवर तब्बल 50 हजारांचा डिस्काऊंट, ऑफर संपण्यासाठी उरले दिवस…

जुनी अल्टो कार खरेदी करण्याचा विचार करताय? मग, इथे मिळेल स्वस्त आणि मस्त डील!

(Suzuki Hayabusa all set to return in global and Indian Market)