जपानी ऑटो कंपनी सुझुकीने 2017 मध्ये भारतात आपली खास दिसणारी बाईक सुझुकी इंट्रूडर 155 (Suzuki Intruder 155) लाँच केली होती. आता कंपनी ही बाईक बंद (Discontinue) करणार असून ती भारतात विकणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सुझुकी इंट्रूडर 155 बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची विक्री न होणे हे आहे. डिसेंबर 2021 ते मे 2022 दरम्यान, त्याचे एकही युनिट विकले गेले नाही. तर त्याआधी नोव्हेंबरमध्ये या बाईकचे फक्त 16 युनिट्स (unit) विकले गेले होते. भारतीय बाजारपेठेत ही बाईक अपयशी ठरल्याची अनेक कारणे आहेत.
सर्वप्रथम, Suzuki Intruder 155 चे डिझाइन भारतीय रस्त्यांसाठी योग्य नसल्याचे दिसून आले. बाईकचे कर्व्ड बाजूचे पेनल आकर्षक दिसत असले तरी ते 155cc बाईकसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वजनदार असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. या कारणांमुळे लोकांना Intruder 155 फारशी आवडलेली दिसत नाही.
150cc सेगमेंट बाईक ग्राहकांना इंट्रूडर 155 चे डिझाईन अद्यापही समजण्यास अवघड असल्याची चर्चा आहे.
जसे, की यात त्रिकोणी हेडलॅम्प, अँगुलर ट्विन एक्झॉस्ट सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच, बाईकचा मागील भाग खूप मोठा आहे, भारतीय बाजारात दाखल झालेल्या बाईक्सच्या तुलनेत हा आकार आकार भारतीय ग्राहकांना रुचला नाही.
याशिवाय बाईकमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापरही लोकांना आवडला नाही, कारण कालांतराने त्याची चमक कमी होत जाते. बाजारात तिची स्पर्धा बजाज अॅव्हेंजरशी होती, पण तिची ब्रँड इमेज अनेक वर्षे जुनी आहे.
त्यामुळे कंपनीची ही बाईकही लोकांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरली. त्याच वेळी, Suzuki Intruder 155 ची किंमत देखील Avenger पेक्षा खूप जास्त होती. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 1.28 लाख रुपये होती, तर बजाज अॅव्हेंजरची किंमत 1.12 लाख रुपये होती. जर ग्राहकाने त्याचे बजेट फक्त 10,000 रुपयांनी वाढवले तर त्याला अॅव्हेंजर 220 मिळेल. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.38 लाख रुपये आहे.