मुंबई : Tata Nexon सप्टेंबर 2021 मधील बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. टाटा मोटर्सने सप्टेंबर महिन्यात 9,211 युनिट्स Nexon डिस्पॅच केल्या आहेत. नेक्सॉनने गेल्या वर्षीच्या तुलनेत 53.34 टक्के वाढ नोंदवली आहे. तर मारुती सुझुकी विटारा ब्रेझा 7 व्या स्थानावर घसरली आहे. सप्टेंबर महिन्यात मारुतीने विटारा ब्रेझाचे 1,847 युनिट्स डिस्पॅच केले आहेत. सेमीकंडक्टरच्या अभावामुळे उत्पादनातील घट हे यामागील एक कारण आहे. या कालावधीत एकूण उत्पादनात सुमारे 60 टक्के घट झाली आहे. दरम्यान, Nexon कॉम्पॅक्ट एसयूव्हीप्रमाणे Nexon EV ला देखील ग्राहकांडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीने Nexon EV च्या 1,022 युनिट्सची विक्री केली आहे. (Tata Nexon is now India’s best selling compact SUV, beats Maruti and Hyundai)
टाटा नेक्सॉनचं डिझाईन ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये तुम्हाला सनरूफ, पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत, जे ऑटो ट्रांसमिशनसह येतात. Tata Nexon मध्ये 120hp पॉवर आणि 170Nm साठी 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तर 1.5-लीटर डिझेल इंजिन 110hp आणि 260Nm सह बनवण्यात आलं आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅनुअल किंवा एएमटीसह उपलब्ध आहे. नेक्सॉनची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम) 6.99 लाख रुपये इतकी आहे.
दरम्यान, टाटाची ही छोटी क्रॉसओव्हर गाडी भारतातील पहिली अशी कार आहे. जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. नेक्सॉनला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटा मोटर्स कंपनी त्यांची प्रत्येक कार मजबूत कशी होईल, याकडे सर्वाधिक लक्ष देते. तसेच टाटाच्या टियागो आणि टिगॉरला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.
टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.
या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरने 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरने नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्च करण्यासाठी 60 मिनिटे पुरेशी आहेत. या कारला 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देण्यात आली आहे, तसेच यामध्ये IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे.
इतर बातम्या
डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही
MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स
(Tata Nexon is now India’s best selling compact SUV, beats Maruti and Hyundai)