Maruti Swift vs Tata Punch : स्वीफ्ट Vs पंच : लुकसह ‘या’ पाच मुद्द्यांवरुन जाणून घ्या दोघांमध्ये अंतर…
भारतीय कार बाजारामध्ये कारची खरेदी करताना तिच्या किमतींसह ग्राहकांकडून विविध पातळ्यांवर पडताळणी करुनच कार्सची खरेदी केली जात असते. यात, किमतीसह, फीचर्स, मायलेज, सेफ्टी आदी विषयांचा खोलवर अभ्यास केला जात असतो.
Maruti Swift vs Tata Punch
Image Credit source: social
मुंबई : भारतीय कार बाजारात गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेली टाटा पंच (Tata Punch) आणि मारुती स्वीफ्ट (Maruti Swift) कारला चांगली पसंती मिळात आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी कच्च्या मालाच्या किंमतीत (Raw material prices) झालेल्या वाढीमुळे कारच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली आपणास दिसून येत आहे. यात, नवीन कार खरेदी करीत असताना मनात अनेक शंका निर्माण होत असतात. अनेकदा कारची खरेदी करतान दुमत असते. सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास सर्वच कंपन्यांच्या कारच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येत असली तरी, या लेखातून आपण टाटा पंच आणि मारुती स्वीफ्ट या दोन कारमधील अंतर पाहणार आहोत.
- मारुतीच्या स्वीफ्टला गेल्या काही वर्षांपासून चांगली मागणी आहे. या कारमध्ये चांगला लूक आणि डिझाईन मिळत असल्याने ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत. सोबतच यात, बल्बस हेडलाईट आणि टेललाइट्स मिळत आहे. यात स्वोपिंग बोनेट्सदेखील मिळत आहेत. यात, स्पोर्टी कट अलॉय व्हील्स देण्यात आलेले असल्याने या कारला स्पोर्टी लूक मिळतो.
- टाटा पंचबाबत बोलायचे झाल्यास, ही एक लेटेस्ट कॉम्पॅक एसयुव्ही कार आहे. यात स्लीक आणि मॉडर्न डिझाईन देण्यात आलेली आहे. यात, एक स्पिल्ट हेडलँप सेटअप आहे. यामध्ये फ्रंट ग्रिल आणि स्पोर्टी फ्रंट बंपर देण्यात आलेले आहेत. सोबतच एलईडी टेल लाइट्स आणि मशिन कट अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत.
-
लांबी | रुंदी | व्हिल्स |
Length | 3,845mm | 3,827mm |
Width | 1,735mm | 1,742mm |
Wheelbase | 2,450mm | 2,445mm |
Height | 1,530mm | 1,615mm |
- नवीन मारुती स्वीफ्टचा लूक आपल्या सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या इतर गाड्यांच्या तुलनेत अधिक आकर्षक आहे. सोबत डॅशबोर्डला खुपच साधारण ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे. यात, 7 इंचाचे टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आलेली आहे. यात, एक मल्टी कलर कंसोलदेखील देण्यात आलेला आहे. यात, एक प्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील देण्यात आला आहे. याचे केबिनदेखील स्पोर्टी आणि डार्क देण्यात आले आहे.
- टाटा पंचचा विचार करता, यालादेखील सिंपल कॅबिन डिझाईन देण्यात आलेली आहे. त्यासोबतच टेक्सचर्ड मटेरिअल देण्यात आलेले आहे. यातदेखील 7 इंचाचा टच स्क्रीन देण्यात आलेला आहे. सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलेले आहे.