मुंबई ; टाटा मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केलेल्या TATA Safari एसयूव्हीला देशभरातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अलीकडील अहवालांनुसार, टाटा कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला अल्ट्रॉझ, नेक्सॉन आणि हॅरियर सारख्या गाड्यांच्या डार्क एडिशनप्रमाणे Tata Safari चं डार्क एडिशन सादर करणार आहे. डार्क एडिशन सफारीला ब्लॅक-आउट फ्रंट ग्रिल आणि चारकोल ब्लॅक अलॉय व्हीलसह ऑल-ब्लॅक एक्सटीरियर मिळेल. एसयूव्हीवरील सर्व क्रोम बिट्स पियानो ब्लॅक एलिमेंट्सने बदलले जातील. सफारी डार्क एडिशनच्या केबिनला हॅरियर डार्क एडिशन प्रमाणेच ट्रीटमेंट मिळेल. (Tata Safari Black Edition To Launch In Early 2022)
यामध्ये ब्लॅक इंटीरियर कलर स्कीम आणि सीटवर “#डार्क” ब्रँडिंगसह बेनेके कॅलिको लेदरेट अपहोल्स्ट्री समाविष्ट असेल. तसेच, व्हेंटिलेटेड सीट्सवर ट्राय-अॅरो पॅटर्न उपलब्ध असेल. दरम्यान, या एसयूव्हीमध्ये कोणतेही यांत्रिक बदल होणार नाहीत.
टाटा मोटर्सने दोन महिन्यांपूर्वी भारतात टाटा सफारीचं गोल्ड एडिशन सादर केलं होतं. या एडिशनलादेखील ग्राहकांची पसंती मिळत आहे. या एसयूव्हीच्या बाहेरील सर्व क्रोम इन्सर्ट्स आता गोल्ड हायलाइट्ससह बदलले गेले आहेत. बाजूला, दरवाजाचे हँडल गोल्डन कलरमध्ये आहेत आणि रूफ रेल्सवरही तेच हायलाइट्स दिसतात. सफारी आणि टाटाच्या मागील बॅजिंगलाही गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. मिड पॅड व्यतिरिक्त, दरवाजाच्या हँडलवर, एअर-कॉन व्हेंट्सच्या आसपास, इन्स्ट्रुमेंट पॅनेलची आउटलाइन आणि डॅशबोर्डवरील अंडरलाइनिंग गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. फीचर लिस्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 8.8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळते जी iRA अॅप बेस्ड कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.
2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.
नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते.
2021 टाटा सफारी डुअल फ्रंटल एयरबॅग्ससह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.
ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं मोठी व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. तसेच गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच या गाडीचं बुकिंगही सुरु होणार आहे. टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय. टाटा मोटर्सने म्हटलं आहे, “भविष्यात नव्या Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जनही येऊ शकतं. या गाडीला त्याला साजेसं डिझाईन साकारण्यात आलं आहे.
या कारच्या इंजिन आणि गियरबॉक्स चा विचार केल्यास या कारमध्ये 2.0 लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. याचा वापर हॅरियरमध्ये केला जावू शकतो. हे इंजिन 170 एचपीचे पॉवर जनरेट करते. याशिवाय कारमध्ये सिक्स स्पीड मॅन्यूअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. ही कार 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम सोबत येते.
इतर बातम्या
ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी
2022 KTM 390 Adventure लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि बाईकची खासियत
सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर