Tata | गणेशोत्सव संपून आता नवरात्रोत्सव, दसरा त्यानंतर दिवाळी (Diwali) आदी विविध मोठे सण एका पाठोपाठ ओळीने येत आहेत. पुढील दोन महिने भारतात सणांची मांदियाळी आहे. सणासुदीच्या काळात(Festival Season) मार्केट जोरात असते. सणासुदीचा हा काळ सुरु होण्याआधीच टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स देण्यास सुरुवात केली आहे.
या सणासुदीच्या काळात, टाटा मोटर्सच्या सर्वात लोकप्रिय वाहनांपैकी एक असलेल्या टाटा टियागोवर ग्राहकांना बंपर डिस्काउंटसह (discount) ऑफर केली जात आहे. टाटा माटर्सच्या (Tata Motors) वतीने टाटा टियागोवर (Tata Tiago) ग्राहकांना एक्सचेंज बोनस, कॅश डिस्काउंट आणि कॉर्पोरेट डिस्काउंट ऑफर केले जात आहेत. या लेखात या सर्व ऑफर्सबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
जर तुम्ही देखील Tata Tiago खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे. या कारच्या XE, XM आणि XT वेरिएंटसह कंपनी 10000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि 3000 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देत आहे. यानुसार, या तिन्ही मॉडेल्समधून पाहिले तर ग्राहक यावर 13 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता.
टाटा टियागोच्या XZ किंवा त्यावरील व्हेरियंटसह उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा मोटर्स 10,000 रुपयांचे कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचे एक्सचेंज डिस्काउंट आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देखील मिळणार आहे. यानुसार ग्राहकांना थेट 23 हजारांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे.
Tata Tiago च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 5,39,900 ते 7,46,900 रुपये आहे संबंधित किंमत ही दिल्ली शोरुमची एक्सशोरुम किंमत आहे.
टीप : येथे सांगण्यात आलेल्या ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठी दिल्या जात आहे, तसेच या ऑफर डीलरनुसार बदलू शकता.