नवी दिल्ली : ग्राहकांमध्ये CNG Cars ची खूप डिमांड आहे. सीएनजी कारच्या डिमांडमागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे पेट्रोलच्या तुलनेत CNG स्वस्त आहे आणि दुसर म्हणजे पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी कारकडून चांगला मायलेज मिळतो. तुम्ही डिसेंबर महिन्यात नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल, तर या महिन्यात कार खरेदीवर तुमची बरीच बचत होईल.
Tata Motors, Hyundai आणि Maruti Suzuki या कंपन्या डिसेंबर महिन्यात आपल्या सीएनजी मॉडल्सची स्वस्तात विक्री करत आहेत. कोण-कोणत्या मॉडल्सवर डिस्काऊंटचा तुम्ही फायदा उचलू शकता त्या बद्दल जाणून घ्या.
Tata Tiago CNG Price in India
टाटा टियागोच्या खरेदीवर तुमची 30 हजार रुपयांची बचत होईल. या हॅचबॅकची किंमत 5,59,900 रुपए (एक्स-शोरूम) पासून 7,14,900 रुपयापर्यंत (एक्स-शोरूम) आहे.
Tigor CNG Price in India
टाटा मोटर्सच्या या कारच्या सीएनजी वेरिएंटवर तुमची 35 हजार रुपयापर्यंत बचत होऊ शकते. या कारची सीएनजी मॉडलची किंमत 7,79,900 रुपयापासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरु होते.
Hyundai Aura Price in India
हुंडईच्या या कारवर डिसेंबर महिन्यात 20 हजारपर्यंत कॅश डिस्काऊंट, 10 हजारापर्यंत एक्सचेंज डिस्काऊट आणि 3 हजार रुपयापर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळतोय. या कारच्या सीएनजी मॉडलची किंमत 8,22,800 रुपयापासून (एक्स-शोरूम, दिल्ली) 8,99,800 रुपयापर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
Maruti Suzuki Celerio Price in India
मारुति सुजुकीच्या हॅचबॅकवर एकूण 50 हजारापर्यंत बचत होऊ शकते. या गाडीवर 30 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंट आणि 20 हजारापर्यंत एक्सचेंज डिस्काऊंट मिळतोय. या कारची सीएनजी वेरिएंटची किंमत 6,37,500 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
लक्ष द्या
वरील कार्सवर मिळणाऱ्या ऑफर्स वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या असू शकतात. अचूक माहितीसाठी तुम्ही जवळच्या डिलरशी संपर्क करा.