नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : नवीन वर्षात चारचाकीचे स्वप्न पाहात असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. तुम्ही पण नवी कोरी कार घरासमोर लावण्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता कार खरेदी करायची असेल तर त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह सेफ्टी फीचर्स असणे आवश्यक आहे. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा करतील, असे सेफ्टी फीचर्स हवेत. कुटुंबासाठी कार खरेदी करताना स्पेस आणि कारची दमदार कामगिरी महत्वाची ठरते. त्यासोबतच कार खरेदी करताना तुमचा पैसा वाचला तर दुधात साखर पडल्यासारखंच होईल. या कंपनीने कार खरेदीसाठी डिस्काऊंट जाहीर केले आहे.
ह्युंदाईवर डिस्काऊंट
ह्युंदाईने त्यांच्या विविध मॉडेलवर डिस्काऊंट जाहीर केले आहे. ही कोरियन कंपनी त्यांच्या जवळपास सर्वच कारवर जोरदार डिस्काऊंट देत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या कारवर किती डिस्काऊंट मिळणार आहे ते…या सर्व कार 2023 मधील आहे. पण त्यांची नोंदणी यावर्षात होणार आहे.
- Hyundai Verna : कंपनीची सर्वात सुरक्षित कार आहे. या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग आहे. या कारवर कंपनी 55 हजार रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट देत आहे. तर 2024 मध्ये उत्पादीत कारवर पण कंपनी सवलत देणार आहे. हे डिस्काऊंट 25 हजार रुपये इतके आहे.
- Hyundai Grand i10 Nios : ग्रँड आय 10 नियोसवर कंपनी 48 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट ऑफर आहे. तर 2024 मध्ये उत्पादित कारवर 33 हजार रुपयांची सवलत मिळेल. ही ऑफर कारच्या सीएनजी मॉडलवर देण्यात येत आहे.
- Hyundai Aura : कंपनीची कॉम्पॅक्ट सेडान ऑरावर 33 हजार रुपयांचे सूट मिळत आहे. तर नवीन उत्पादित ऑरावर 28 हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे. आय 10 च्या ऑराच्या सीएनजीवर पण सवलत देण्यात येणार आहे.
- Hyundai i20 : ही कंपनीची सर्वात लोकप्रिय हॅचबॅक आय 20 वर कंपनी 25 हजार रुपयांची सवलत देत आहे. तर कंपनीच्या या कारच्या 2024 मॉडलवर पण सवलत देण्यात येत आहे. या वर्षातील सवलत
10 हजार रुपये आहे.
- Hyundai Venue : कंपनीची कॉम्पॅक्ट एसयुव्ही व्हॅल्यूवर 30 हजार रुपयांचे डिस्काऊंट देण्यात येणार आहे. ही सवलत मॅन्यूअल व्हेरिएंट वर देण्यात येत आहे. तर कंपनी ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 25 हजार रुपयांची सवलत देत आहे.