पुण्यातल्या रस्त्यांवर Tesla Model Y चं टेस्टिंग, लवकरच लाँच होणार, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

| Updated on: Feb 06, 2022 | 1:45 PM

अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) सध्या भारतीय कार बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. असे मानले जाते की कंपनी भारतात त्यांचे दोन सर्वात परवडणारे मॉडेल - मॉडेल 3 (Tesla Model 3) किंवा मॉडेल Y (Tesla Model Y) सह पदार्पण करेल.

पुण्यातल्या रस्त्यांवर Tesla Model Y चं टेस्टिंग, लवकरच लाँच होणार, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
Tesla Model Y (PS- Tesla Club India)
Follow us on

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) सध्या भारतीय कार बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. असे मानले जाते की कंपनी भारतात त्यांचे दोन सर्वात परवडणारे मॉडेल – मॉडेल 3 (Tesla Model 3) किंवा मॉडेल Y (Tesla Model Y) सह पदार्पण करेल. नुकतेच टेस्ला मॉडेल Y कार भारतात टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली आहे. आपल्या देशात Y मॉडेल दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीदेखील ही कार रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळी इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही अधिक जवळून पाहायला मिळाली. टेस्ला क्लब इंडियाच्या सोशल मीडिया हँडलवर या कारचे फोटो शेअर करण्यात आले असून ते नितेश बोराणे यांनी टिपले आहे. त्यांनी पुण्यात टेस्लाचे Y मॉडेल पाहिले.

मॉडेल Y व्यतिरिक्त, आपण यापूर्वी भारतात टेस्ला मॉडेल 3 इलेक्ट्रिक सेडानचे अनेक लीक झालेले फोटो पाहिले आहेत. मॉडेल Y बद्दल बोलायचे झाल्यास ही कार मॉडेल 3 च्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि जागतिक स्तरावर टेस्ला एसयूव्ही 5 आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये सादर केली जाते. हा कारचे काही फोटो समोर आले आहेत. कारचा पुढील भाग आणि LED टेललाइट्स आकर्षक आहेत. स्वेप्टबॅक हेडलॅम्प आणि मध्यभागी एअरडॅम असलेले कोरीव डिझाइन मिळते. प्रोफाइल सिल्व्हर अलॉय व्हील्ससह आकर्षक आहे. तर मागील बाजूस शार्प-लुकिंग बूट लिड आणि क्लॅडेड रिअर बम्पर मिळते.

परफॉर्मन्स आणि रेंज

जागतिक स्तरावर, Tesla मॉडेल Y लाँग रेंज AWD आणि परफॉर्मन्स या दोन पर्यायांमध्ये ऑफर केली जाते. दोन्ही मॉडेल्स ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्ससह येतात, प्रत्येक एक्सलसाठी एक, इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) फंक्शन देतात. जुनी लॉन्ग रेंज ऑप्शन कार 505 किमी पर्यंतची रेंज देते. ही कार 4.8 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-97 किमी प्रतितास वेग धारण करु शकते. अधिक पॉवरफुल परफॉर्मन्सवालं व्हेरिएंट 480 किमी इलेक्ट्रिक रेंज देते.

कधी होणार लाँच?

सध्या, टेस्ला पूर्णपणे आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कमी करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा करत आहे आणि या समस्येचे निराकरण होण्यापूर्वी कार भारतात लाँच होण्याची शक्यता कमी आहे. टेस्ला कार अधिकृतपणे आपल्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी भारताला अजून थोडी वाट पहावी लागेल असे दिसते.

इतर बातम्या

तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय ‘गाडी बुला रही है…’; किंमत फक्त…

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज