मुंबई – आपण नेहमी अनेक गाडी प्रेमी (car lover)पाहत असतो, तसेच ते घेतलेल्या गाडीला किती जपतात हे सुध्दा अनेकदा पाहिलेलं आहे. तसेच काही गाडी प्रेमी असे असतात की त्यांना फक्त गाड्याची माहिती घ्यायला आवडते. तसेच ते इतरांना नेहमी नवीन गाड्यांबाबत सांगत असतात. पंरतु टेस्लाच्या (tesla) गाड्यांबाबत चर्चा करणार आहोत. टेस्ला गाड्या अनेकांना आवडल्या असल्याचे आपण पाहिले कारण अनेकांनी त्या खरेदी केल्या आणि चागल्या असल्याच्या सुध्दा सांगितल्या होत्या. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Reeve Musk) हे नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात. तसेच ते अनेकांची मते सोशल मीडियाच्यातून (social media)वाचत असतात. त्यांच्या अनेक सोशल मीडियावरील पोस्ट भविष्यातील अनेक गोष्टी दाखवणा-या असतात असं त्यांच्या चाहत्यांचं मत आहे. 2020 मध्ये टेस्ला मॉडेल एक्सचे उत्पादन थांबवण्याच्या निर्णय अत्यंत चुकीचा होता असं त्यांनी नुकतचं जाहीर केलं आहे.
टेस्लाच्या जाहीर कबूली
टेस्लाच्या मॉडेल अनेक लोकांच्या पसंतीला उतरल्या होत्या. त्या गाडीला फाल्कन विंगसारखा दरवाजा आहे. टेस्लाने पहिलं मॉडेल 2015 मध्ये लाँच केल होतं. पण या कंपनीने जुन मॉडेल अद्यायवत करण्यासाठी उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला होता. नवीन गाड्यांच्या बाबतीतला माझा निर्णय चुकला असल्याचे त्यांनी जाहीर कबूल केले आहे. तसेच त्यांनी मी अजून त्या निर्णयातून सावरलो नसल्याचे देखील म्हणाले आहेत. 2020 मध्ये गाडीचं उत्पादन न करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या काळात अनेकांना त्रास झाला. तसाच त्रास टेस्लाचे सीईओ एलोन मस्क झाला आहे. कारण त्यांनी आतापर्यंत आम्ही त्यातून सावरलो नसल्याचे म्हणाले आहेत.
उत्पादनात घट
टेस्लाच्या मॉडेलच्या उत्पादनात मॉडेल एक्स आणि मॉडेल एसचे घटले होते. २०२० या वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये ५५ टक्क्यांनी घसरल्याचं टेस्लाचे सीईओ एलोन मस्क म्हणणं आहे. अनेक ग्राहकांचा कंपनीकडे पाहण्याचा कल बदलला असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच २०२० ते २०२१ या कालावधीत कंपनीला मोठा फटका बसल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. एखादा निर्णय चुकल्यानंतर त्याचे परिणाम किती भयानक असतात याचा अनुभव एलोन मस्क यांना आला आहे. कारण सोशल मीडियावर दिलखुलास गप्पा मारणा-या तसेच चाहत्यांशी संपर्कात एलोन मस्क यांचं कौतुकही करतात. परंतु घेतलेल्या निर्णयाचा त्यांना अधिक तोटा बसला आहे.