देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती (Maruti) सुझुकी पुढील काही महिन्यांमध्ये एक नव्हे तर दोन नवीन कार लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. रिपोर्टनुसार ग्रँड विटाराशिवाय मारुती अल्टोचे नवीन मॉडेल (new Alto) लाँच करण्याची शक्यता आहे. मारुती 20 जुलै रोजी ग्रँड विटाराचे (Grand Vitara) ग्लोबल डेब्यू करणार आहे. दोन्ही कार्स मारुतीच्या लाइनअपमध्ये आहेत. ऑल न्यू अल्टोला संपूर्णपणे नवीन स्वरुपामध्ये लाँच करण्याची तयारी सुरु आहे. कंपनी यात, 1.0 लीटरचे नवीन पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे. अपकमिंग अल्टो नवीन डिझाईन आणि मॉडर्न फीचर्ससोबत बाजारात येणार आहे. या कारची स्पर्धा रेनॉल्ट क्विडसह मारुती एस-प्रेसो सोबत होणार आहे.
मारुती सुझुकी नवीन अल्टोला एक ऑल न्यू प्लॅटफॉर्मवर विकसित केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी सुझुकी हर्टेक्ट प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ऑल न्यू अल्टोमध्ये एक नवीन के10सी 1.0 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या मॉडेलच्या 796 सीसी इंजिनला खालील व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करुन दिले जाउ शकते. दोन इंजिन ऑप्शन्ससोबत मारुती जास्तीत जास्त कंज्यूमरपर्यंत आपली पोहच वाढवू शकते.
2000 मध्ये पहिल्यांदा लाँच झालेली मारुती अल्टोला सध्याच्या मॉडेल 2012 पासून चालवले जात आहे. यात 2019 मध्ये काही बदल करण्यात आले होते. परंतु अपकमिंग अल्टो एक संपूर्णपणे नवीन अल्टो असणार आहे. यात, वरच्या दिशेने झुकलेले हेडलँप, चंकी फॉग लँप एनक्लोजर आणि जाळीदार ग्रील फ्रंट बंपरमध्ये मिळणार आहे. टेलगेटचे डिझाईन काही प्रमाणात सरळ असणार आहे. याच्या टेललँपचा आकार सेलेरियो सारखाच असणार आहे.
ऑल न्यू अल्टोच्या इंटीरियरशी निगडीत माहिती अद्याप समोर आलेली नाही. ऑटोकारच्या मते, नवीन अल्टोमध्ये नवीन डॅशबोर्ड डिझाईन मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. अल्टोच्या वरील व्हेरिएंटमध्ये टचस्क्रीन, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल विंग मिरर, पॉवर विंडोसह अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. असा मानल जातय, की मारुती अल्टोचे सध्याचे मॉडेलसारखेच नवीन अल्टो कोणत्याही व्हेरिएंटमध्ये रियर वाइपर देणार नाही.