भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एसयुव्ही (SUV) सेगमेंटच्या कारमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगली वाढ होत आहे. अधिकाधिक वाहन निर्माता कंपन्या आपल्या वाहन निर्मितीमध्ये एसयुव्ही कारला लाँच करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय कार बाजारामध्ये सध्या अनेक नवीन अपकमिंग कार लाँच होण्याच्या तयारीमध्ये आहेत. या लेखात आज आपण पुढील तीन महिन्यांमध्ये लाँच होत असलेल्या 4 एसयुव्ही कार्सची (upcoming 4 suv car) माहिती जाणून घेणार आहोत. या अपकमिंग एसयुव्ही कार्सची भारतातील अनेक ग्राहक वाट बघत आहेत. एसयुव्ही सेगमेंट म्हणजे, स्पोर्ट्स युटीलिटी व्हीकल, ज्यातून युजर्सना एक चांगला ग्राउंड क्लिअरन्स, चांगला बूटस्पेस आणि दमदार व्ह्यू एक्सपीरियन्स (View experience) मिळू शकतो.
1) भारतीय कार बाजारामध्ये नुकतेच टोयोटाने आपली नवीन डी सेगमेंटची हायब्रिउ कार लाँच केली होती. आता मारुती आपली नवीन हायब्रिड कारच्या लाँचिंगसाठी तयारी करीत आहे. या कारचे संभावित नाव मारुती सुझुकी ग्रँड विटारा आहे. हायब्रिड इंजिनमुळे ही कार चांगला मायलेज आणि दमदार इंटीरियरसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.
2) 13 जुलैला ह्युंदाई आपली नवीन ह्युंदाई टकसनला लाँच करण्याची शक्यता आहे. या कारची स्पर्धा नुकतीच आपल्या किंमतीत वाढ केलेल्या जीप कंपाससोबत होणार आहे. टकसन ही एक फ्लॅगशिप एसयुव्ही कार असून यात प्रीमिअम केबिन आणि डायनेमिक डिझाईन मिळणार आहे. ही 30 लाख रुपयांच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध असून एक दमदार एसयुव्ही कार आहे.
3) जुलैमध्ये सिंट्रोनचे सी 3 मॉडेलदेखील लाँच करण्यात येणार आहे. ही एक कॉम्पॅक्ट सेगमेंटची एसयुव्ही कार असणार आहे. याचे नाव टाटा पंच, मारुती सुझुकी इग्निन, निशान मेग्नाइट आणि रेनो किगर यांच्यासोबत असणार आहे. भारतामध्ये ही सिट्रोनची दुसरी कार असून या आधी कंपनीने सिट्रोन सी 5 एअरक्रोसला लाँच केले आहे.
4) भारतीय कार बाजारामध्ये या महिन्याच्या 26 तारखेला वॉल्वोचीही देखील एक नवीन कार लाँच होणार असून या कारचे नाव वॉल्वो एक्ससी 40 रिचार्ज असे आहे. या कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्सला फीट करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून 408hp ची पावर आणि 660 Nm चा टार्क जनरेट करण्यात येउ शकतो. कंपनीचा दावा आहे, की या लावण्यात आलेल्या बॅटरी सिंगल चार्जवर 418 किमीची रेंज मिळवू शकतात.