Top 10 Best Selling Suv : कोणतेही वाहन खरेदी करायचे ठरवले की, मार्केटमध्ये कोणत्या कारची, एसयूव्हीची विक्री अधिक सुरु आहे, ग्राहकांचा कल कोठे सर्वाधिक आहे, याचा विचार केला जातो. आज आम्ही तुम्हाला टॉप 10 बेस्ट सेलिंग SUV कोणत्या आहेत, याविषयीची माहिती देणार आहोत. नवीन आणि पहिली कार खरेदी करणारे सध्या बहुतेक लोक SUV घेणारे आहेत. कारण फायनान्सच्या ट्रेंडमुळे लोकांना SUV खरेदी करणे सोपे झाले आहे. तुम्ही विचार करत असाल की यावर्षी सणासुदीच्या हंगामात ऑक्टोबर महिन्यात कोणत्या SUV टॉप 10 मध्ये होत्या, तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ऑक्टोबर महिन्यात एसयूव्ही टॉप 10 मध्ये नंबर 1 चेअर ह्युंदाई क्रेटा होती, ज्याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपये आहे. टॉप टेनमध्ये ह्युंदाई आणि मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांचा समावेश आहे. त्यामुळे आणखी विलंब न लावता आम्ही तुम्हाला ऑक्टोबर 2024 च्या टॉप 10 एसयूव्हीबद्दल सांगत आहोत.
ह्युंदाई क्रेटा अलीकडच्या काही महिन्यांत SUV प्रेमींची आवडती बनली आहे. ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात क्रेटा 17,497 लोकांनी खरेदी केली होती आणि त्याच्या विक्रीत गेल्या वर्षी सुमारे 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रेझा ही मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार होती आणि ती 16,565 ग्राहकांनी खरेदी केली होती. ब्रेझाच्या विक्रीत महिन्याच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मारुती सुझुकी फ्रॉंक्सच्या विक्रीत अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 16,419 ग्राहकांनी क्रॉसओव्हर खरेदी केली होती.
टाटा मोटर्सची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही पंच ऑक्टोबरमध्ये चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही होती आणि ती 15,740 ग्राहकांनी खरेदी केली होती. पंचच्या विक्रीत महिन्याच्या तुलनेत सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिकच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात 15 हजार 677 जणांनी खरेदी केली असून ही 15 टक्क्यांची वाढ आहे.
टाटा मोटर्सची सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV नेक्सॉनची 14,759 युनिट्सची विक्री झाली आणि सणासुदीच्या हंगामात त्याच्या विक्रीत सुमारे 13 टक्क्यांनी घट झाली.
मारुती ग्रँड विटारा ही देखील आनेकांची आवड आहे. अनेक लोकांना मारुती ग्रँड विटाराचा लूक आवडतो.
ह्युंदाई मोटर इंडियाच्या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV व्हेन्यूची 10,901 युनिट्सची विक्री झाली आणि त्याच्या विक्रीत 6 टक्क्यांनी वाढ झाली.
महिंद्राच्या लोकप्रिय मिडसाइज SUV 700 ने ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामात 10,435 युनिट्सची विक्री केली, जी वार्षिक तुलनेत 12.24 टक्क्यांनी वाढली आहे.
महिंद्रा अँड महिंद्राची कॉम्पॅक्ट SUV बोलेरो सीरिजची 9849 युनिट्सची विक्री झाली असून ऑक्टोबर 2024 मध्ये ती 2 टक्क्यांनी वाढली आहे.