मुंबई : ऑटो मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्ही (compact SUV) भारतात सर्वाधिक चालणाऱ्या सेगमेंटमधील एक आहे. जवळपास प्रत्येक वाहन निर्माता कंपनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्हीचा आवर्जुन सहभाग करीत असते. त्यामुळे साहजिकच यातून स्पर्धा वाढतून अनेक कॉम्पॅक्ट एसयुव्ही निर्माता कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करीत असतात. ह्युंडाई व्हेन्यू आणि किया सोनेट सारख्या कार बाजारात येण्याआधी ब्रेझा (maruti breeza) सर्वाधिक काळापर्यंत या गाड्यांना लीड करीत होती. परंतु नव्या गाड्या घेणे सर्वांनाच परवडेल असे नाही. त्यामुळे आता लोक सेकंड हँड गाड्यांचा देखील विचार करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सेकंड हँड गाड्याचा बाजारदेखील तेजीत बघायला मिळत आहे. या लेखात आम्ही काही कॉम्पॅक्ट एसयुव्ही गाड्यांची यादी आणली आहे, ज्यांना रिसेल व्हॅल्यू (resale value) अधिक आहे.
या यादीत पहिले नाव आहे, ते मारुती सुझुकी विटारा ब्रेझाचे. मारुती सुझुकीने ब्रेझाच्या डिझेल इंजिनला बंद केले होते. तसेच 1.3 लीटर फिएट-सोर्स इंजिनला बीएस 6 उत्सर्जन नियमांच्या मापदंडात देखील अपग्रेट केले नाही. इंजिन आपल्या फ्यूअल एफिशियंसी आणि टॉर्कसाठी प्रसिध्द होते. डिझेल इंजिनला पेट्रोल इंजिनमध्ये बदलण्यात आले होते. आतापर्यंत अनेक असे लोक आहेत, जे एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये डिझेल इंजिनच्या पंचला जास्त पसंती देत आहेत. यामुळे डिझेल इंजिन असलेल्या जुन्या ब्रेझाची किेंमतही चांगली राहिली आहे. तीन वर्ष जुन्या डिझेल ब्रेझाला दोन वर्ष जुन्या ह्युंडाई वेन्यूच्या तुलनेत जास्त रिसेल व्हॅल्यू आहे.
व्हेन्यू कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये उशिरा आलेल्या कारपैकी एक कार आहे. ही कार विटारा ब्रेझाच्या
मार्केट शेअरचा एक मोठा हिस्सा घेण्यासाठी यशस्वी ठरली आहे. ह्युंडाई अक्सर, विटारा ब्रेझापेक्षा जास्त व्हेन्यूची विक्री करण्यात आलेली आहे. व्हेन्यूची रिसेल व्हॅल्यू यासाठी जास्त आहे, कारण कंपनीने या गाडीची किंमत सातत्याने वाढवली आहे. गाडीच्या व्हेरिएंट म्हणजे मॅन्यूअल गिअरबॉक्सची व्हॅल्यू जास्त आहे.
नेक्सॉनने टाटा मोटर्सला भारतीय मार्केट शेअर मिळविण्यासाठी खूप मोलाची मदत केली आहे. मोठ्या स्पर्धेतही या गाडीला चांगली मागणी राहिली आहे. परंतु असे असले तरी नेक्सॉनची रिसेल व्हॅल्यू म्हणावी तशी चांगली नाही. एएमटी गिअरबॉक्ससोबत पेट्रोल इंजिनची व्हॅल्यू जास्त आहे, कारण या गाडीला शहरी भागात ड्राइव्हींग करणार्या लोकांकडून जास्त मागणी आहे. यात त्यांना ऑटोमॅटिक गिअरबॉक्सही उपलब्ध होत असतो. यासह महिंद्रा एक्सयुव्ही 300, ईकोस्पोर्ट, फोर्ड फ्रीस्टाइल, होडा WR-V आदी गाड्यांनाही चांगली रिसेल व्हॅल्यू आहे.