नवी दिल्ली | 5 जानेवारी 2024 : इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक बदल होत आहे. हे क्षेत्र दिवसागणिक विविध अपडेट घेऊन समोर येत आहे. सध्या जगभरातील इलेक्ट्रिक कारचे उत्पादन लिथियम ऑयन बॅटरीच्या आधारे करण्यात येत होते. पण लिथियमचा साठा फारसा नाही. लिथियमला पर्याय शोधण्यात येत होता. त्याला यश आले आहे. चीनमधील ही कंपनी पहिली सोडियम आयन बॅटरीवर आधारीत इलेक्ट्रिक कार घेऊन बाजारात येत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कारचा खर्च कमी होईल आणि या कार अजून स्वस्त होतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
या महिन्याच्या अखेरीस कार बाजारात
सोडियम आयन बॅटरीवर चालणारी ही इलेक्ट्रिक कार किंमतीत स्वस्त असेल. चीनची ऑटोमोबाईल कंपनी JAC मोटर्सने लिथियमविना कार तयार करण्याचे आव्हान पेलावले आहे. कंपनी सोडियम आयन बॅटरीवरील कार बाजारात आणत आहे. यावर्षी जानेवारी 2024 च्या अखेरीस ही कार बाजारात येईल.
JAC यीवेई EV हॅचबॅक
JAC मोटर्सच्या दाव्यानुसार, सोडियम आयन बॅटरीसाठी खर्च लिथियम बॅटरीच्या तुलनेत कमी आहे. ही बॅटरी सर्वच ऋतूत चांगली कामगिरी करते. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकलला प्रोत्साहन देण्यासाठी ही बाब पुरेशी आहे. चीनमधील मीडियानुसार, JAC यीवेई EV हॅचबॅक ही कार याच महिन्याच्या अखेरीस ग्राहकांना मिळेल.
कशी आहे पहिली सोडियम आयन बॅटरीवरील कार
JAC यीवेई EV हॅचबॅक कारला चार दरवाजे आहेत. यामध्ये HiNa सोडियम बॅटरी देण्यात आली आहे. तिची क्षमता 25 kwh असेल आणि ही 20 मिनिटांमध्ये 10 ते 80 टक्के चार्ज होईल. ही कार 252Km चा रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, सोडियम आयन बॅटरी, लिथियम आयन बॅटरीच्या तुलनेत अत्यंत स्वस्त असेल. त्यामुळे इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये क्रांती येण्याचा दावा करण्यात येत आहे. मॉड्यूलर युनिटाईज्ड इनकॅप्सुलेशन हनीकॉम्ब या पद्धतीने बॅटरी असेंबल करण्यात आली आहे.
कमी आणि उच्च दाबात दमदार कामगिरी
सोडियम आयन बॅटरीची डेंसिटी खूपच कमी असते. तर लिथियम आयन बॅटरची डेंसिटी अधिक असते. त्यामुळे सोडियम बॅटरी कमी आणि उच्च दाबात दमदार कामगिरी बजावते. लिथियम आयन बॅटरीपेक्षा सोडियम आयन बॅटरीचा चार्जिंगचा वेग जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे भविष्यात या बॅटरीमुळे इलेक्ट्रिक व्हेईकलचे मार्केट वाढण्याची शक्यता आहे.