Tiago iCNG आणि Tigor iCNG मध्ये मिळतात शानदार फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स आणि सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती

| Updated on: Jan 20, 2022 | 10:31 AM

टाटा मोटर्स (Tata Motors) या भारताच्‍या अग्रगण्‍य ऑटोमोबाइल ब्रॅण्‍डने बुधवारी त्‍यांच्या लोकप्रिय कार टियागो आणि टिगॉर या दोन्ही गाड्या प्रगत सीएनजी इंजिनसह लाँच केल्या.

Tiago iCNG आणि Tigor iCNG मध्ये मिळतात शानदार फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स आणि सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती
Tata Cars -Tiago iCNG, Tigor iCNG
Follow us on

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) या भारताच्‍या अग्रगण्‍य ऑटोमोबाइल ब्रॅण्‍डने बुधवारी त्‍यांच्या लोकप्रिय कार टियागो आणि टिगॉर या दोन्ही गाड्या प्रगत सीएनजी इंजिनसह लाँच केल्या. आयसीएनजी (iCNG) सक्षम वाहने चांगल्या ग्राहक अनुभवासह अविश्‍वसनीय कार्यक्षमता, दर्जात्‍मक सुरक्षितता देतात आणि या वाहनांमध्‍ये प्रभावी वैशिष्ट्यांसह सेगमेंट-फर्स्‍ट तंत्रज्ञासह सुसज्ज आहे.

या लाँचसह टाटा मोटर्सची सीएनजी बाजारपेठेतील त्‍यांची उपस्थिती प्रबळ करण्‍याची, कोणतीही तडजोड न करता प्रगत सीएनजी तंत्रज्ञानाचा अनुभव देण्याची योजना आहे. भारतातील सीएनजी बाजारपेठांशी संलग्‍न राहत टाटा मोटर्सची नवीन आयसीएनजी श्रेणी टियागो आयसीएनजीसाठी 6,09,900 लाख रूपये, एक्‍स-शोरूम दिल्‍ली या सुरूवातीच्‍या किंमतीत कंपनीच्‍या अधिकृत सेल्‍स आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असेल.

नवीन टियागो आयसीएनजी व टिगोर आयसीएनजीमध्‍ये रेवोट्रॉन 1.2 लीटर बीएस-6 इंजिनची शक्‍ती आहे. हे इंजिन 73 पीएसची मॅक्सिमम पॉवर निर्माण करते, जी या सेगमेंटमधील कोणत्‍याही सीएनजी कारसाठी सर्वोच्‍च आहे. आयसीएनजी कार्समध्‍ये दर्जात्‍मक तंत्रज्ञान व वैशिष्‍ट्ये आहेत. तसेच या कार्स सानुकूल कार्यक्षमता देण्‍यासाठी आणि पेट्रोल ते सीएनजी व सीएनजी ते पेट्रोल या इंधन मोड्सच्‍या एकसंधी शिफ्टिंगसाठी उत्तमरित्‍या प्रोग्राम करण्‍यात आल्‍या आहेत. ज्‍यामुळे ग्राहकांना तडजोड न करता सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. सीएनजी ग्राहकांना अनेक पर्यायांमधून निवड करण्‍याची सुविधा देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये टाटा मोटर्सने टियागो व टिगोरच्‍या ट्रिम लेव्‍हल्‍समध्‍ये त्‍यांची आयसीएनजी वाहने लाँच केली आहेत. यांची किंमत खाली तक्‍त्‍यामध्‍ये दिली आहे.

टियागो आणि टिगॉरचे व्हेरिएंट्स आणि त्यांच्यां किंमती

 

 टाटा टियागो
(Tata Tiago)

व्हेरिएंट्स (1.2L CNG Manual) किंमत ( in INR, Ex-showroom Delhi)
XE 6,09,900
XM 6,39,900
XT 6,69,900
XZ+ (ST) 7,52,900
XZ+ (DT) 7,64,900
  टाटा टिगॉर
(Tata Tigor)
XZ 7,69,900
XZ+ (ST) 8,29,900
XZ+ (DT) 8,41,900

आयसीएनजी कार्सचे 4 मुख्य फीचर्स

  • ‘इन्‍क्रेडिबल’ कार्यक्षमता – दर्जात्‍मक शक्‍ती, सुलभ गतीशीलता, प्रत्‍येक प्रदेशामध्‍ये प्रभावी ड्रायव्हिंग आणि रिटर्न्‍ड सस्‍पेंशनसह टियागो व टिगोर आयसीएनजी त्‍यांच्‍या संबंधित विभागामध्‍ये निश्चितच सर्वात शक्तिशाली कार्स आहेत.
  • ‘आयकॉनिक’ सुरक्षितता – सुरक्षिततेसाठी प्रमाणित व्‍यासपीठावर निर्माण करण्‍यात आलेल्‍या दोन्‍ही कार्समध्‍ये अत्यंत मजबूत स्‍टीलचा वापर करण्‍यात आला असून दर्जात्‍मक सुरक्षितता वैशिट्ये आहेत- जसे ड्युअल एअरबॅग्‍ज, एबीएससह ईबीडी व कॉर्नर स्‍टेबिलिटी कंट्रोल.
  • ‘इंटेलिजण्‍ट’ तंत्रज्ञान – सिंगल अडवान्‍स ईयीसू, इंधनांमध्‍ये ऑटो स्विचओव्‍हर, सीएनजीमध्‍ये डायरेक्‍ट स्‍टार्ट (सेगमेंट फर्स्‍ट), जलद रिफ्यूइलिंग आणि डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टरसह टियागो व टिगोर आयसीएनजी त्‍यांच्‍या मालकांना अधिक आरामदायीपणा व सोयीसुविधा देण्‍यासाठी उत्तमरित्‍या डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.
  • ‘इम्‍प्रेसिव्‍ह’ वैशिष्‍ट्ये – ग्राहकांना आनंददायी मालकीहक्‍क अनुभव मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी दोन्‍ही कार्समध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे. टियागो आयसीएनजीमध्‍ये प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स, एलईडी डीआरएल, बाहेरील भागावर क्रोम सजावट आणि प्रिमिअम ब्‍लॅक व बीज ड्युअल टोन इंटीरिअर्स अशी नवीन वैशिष्‍ट्ये आहेत. टिगोर आयसीएनजीमध्‍ये रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्‍प्‍स, ड्युअल टोन रूफ, नवीन सीट फॅब्रिक आणि नवीन ड्युअल टोन ब्‍लॅक व बीज इंटीरिअर्स अशी वैशिष्‍ट्ये आहेत.

2 वर्षांची वॉरंटी

तसेच सध्‍याच्‍या कलर पॅलेटमध्‍ये अधिक भर करत कंपनीने टियागोमध्‍ये आकर्षक नवीन मिडनाइट प्‍लम आणि टिगोरमध्‍ये मॅग्‍नेटिक रेड या रंगांची भर केली आहे. दोन्‍ही कार्स सर्व ग्राहकांसाठी प्रमाणित पर्याय म्‍हणून 2 वर्षांची वॉरंटी किंवा 75 हजार किमीपर्यंतच्‍या वॉरंटीसह येतील, जे अगोदर होईल ते लागू असेल.

सीएनजी मोडवर स्टार्ट

सध्या सीएनजी गाड्यांबाबत सर्वात महत्वाची समस्या म्हणजे स्टार्ट केल्यावर सुरुवातीला पेट्रोलवर चालते. त्यानंतर सीएनजी मोडवर शिफ्ट करावे लागतात. टाटा मोटर्सने दोन्ही सीएनजी व्हेरियंटमध्ये ही अडचण दूर केली आहे. दोन्ही गाड्या स्टार्ट केल्यावर थेट सीएनजी मोडवर चालतील. त्यामुळे पेट्रोल नंतर सीएनजी असा बदल करावा लागणार नाही.

ऑटो मोड चेंज

टाटा मोटर्सच्या सीएनजी कारचे वैशिष्ट्य ऑटो शिफ्ट आहे. त्यामुळे गाडीतील सीएनजी संपण्यापूर्वीच सिग्नल दिला जाईल. गाडी पेट्रोल मोडमध्ये शिफ्ट होईल. सुरक्षितता आणि कामगिरी या दोन्हींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. सीएनजी किटमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्यामुळे गॅस लीक होण्याचा धोका टळणार आहे. कंपनीने दोन्ही गाड्यांत लीक डिटेक्शन आणि थर्मल प्रोटेक्शन सारखे फीचर्स उपलब्ध केले आहेत.

सीएनजी गाड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी गाड्या खरेदीकडे कल दिसून येत आहे. देशातील विविध शहरांत सीएनजी पंपांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे इको-फ्रेंडली वाहनांना ग्राहक मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवित आहेत.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त, Tata Motors उद्या दोन नवीन CNG कार लाँच करणार

धमाकेदार ऑफर! Maruti Alto अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

(Tiago iCNG and Tigor iCNG offers great features, know details and prices of all the variants)