Best Mileage Scooters : उत्तम मायलेज देतात ‘या’ 5 स्कूटर्स, किंमत किती?
Best Mileage Scooters : भारतीय ग्राहकाला एखादी गाडी विकत घ्यायची असेल, तर मायलेज त्यांच्या विशलिस्टमध्ये सर्वात वर आहे. आम्ही 5 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या स्कूटर्सबद्दल बोलत आहोत. या लिस्टमध्ये यामाहा, TVS, होंडा, हीरो आणि सुजुकी स्कूटर्स आहेत.
1 / 5
Yamaha Fascino 125 Fi Hybrid स्कूटर रेट्रो-स्टाइलमध्ये येते. ही स्कूटर प्रती लीटर 68 किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते. या स्कूटरच वजन जवळपास 99 किलोग्रॅम आहे. या स्कूटरची किंमत 79,600 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.
2 / 5
TVS Jupiter 125 ची किंमत 86,405 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. 109.7 सीसी इंजन असलेल्या या स्कूटरचा मायलेज 62 किलोमीटर प्रती लीटर आहे. या स्कूटरमध्ये मोबाइल चार्जिंग सॉकेट आणि लो फ्यूल अलर्ट सारखे फीचर्स मिळतात.
3 / 5
Hero Pleasure Plus XTec स्कूटरची किंमत 71,213 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. यात एकूण 4 वेरिएंट आपण खरेदी करु शकतो. 110.9 सीसी सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत ही स्कूटर प्रती लीटर 50 किलोमीटर मायलेज देऊ शकते.
4 / 5
Honda Activa 6G ची सुरुवातीची किंमत 76,234 रुपये (एक्स-शोरूम) आहे. 109.5 सीसी पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या या स्कूटरच आऊटपुट 7.7bhp/ 8.9Nm आहे. या स्कूटरचा मायलेज 45kmpl पर्यंत आहे.
5 / 5
Suzuki Access 125 स्कूटरची बेस प्राइस 79,899 रुपयापासून स्टार्ट होते. यात 124 सी सिंगल सिलेंडर एयर कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलय. प्रती लीटर 40 किलोमीटरचा मायलेज मिळू शकतो.