मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एसयुव्ही (SUV) सेगमेंटची वेगाने वाढ होत आहे. नागरिकांमध्ये एसयुव्ही सेगमेंटच्या कार्सला मोठी मागणी आहे. परंतु साधारणत: कुठलीही कार खरेदी करताना चिंता असते ती मायलेजची. मायलेज (mileage) चांगला असलेल्या कार्सच्या खरेदीला प्राधान्यक्रम दिला जात असतो. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहता मायलेजला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. या लेखात आपण अशा काही एसयुव्ही सेगमेंटमधील कारची माहिती घेणार आहोत ज्या तुम्हाला उत्तम मायलेज देणार आहे. एक लीटर पेट्रोलवर या गाड्यांना तब्बल 18 किमीहून अधिक रेंज मिळत आहे. यासह त्यांच्या फीचर्सचीही (Features) माहिती घेणार आहोत.
निसान किक्स 1.3 टी 156 एचपी, फोर सिलेंडर, 1.3 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसोबत उपलब्ध आहे. निसानची ही एसयुव्ही 6 मॅन्यूअल आणि सीव्हीटी ट्रांसमिशनसोबत उपलब्ध आहे. मायलेजबाबत बोलायचे झाल्यास, ही एसयुव्ही कार ARAI च्या तुलनेत 15.8kpl चे मायलेज देते. या कारची एक्सशोरुम किंमत 14.90 लाख रुपयांपासून सुरु होते.
किआ सेल्टोस 1.5 आपल्या सेगमेंटमधील एक दमदार एसयुव्ही कार आहे. ही 115 एचपी, 1.5 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड फोर-सिलेंडर इंजिनसह उपलब्ध आहे. युजर्सला यात 6 मॅन्यूअल ट्रांसमिशन किंवा ऑटोमेटिक ट्रांसमिशन मिळत आहेत. किआ सेल्टोस 1.5 चा ARAI च्या तुलनेत 16.65kpl चे मायलेज देते. याची सुरुवातीची किंमत 11.25 लाख रुपये आहे.
ह्युंडाई क्रेटा 1.5 मध्ये सेल्टोस सारखे 115 एचपी, 1.5 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड फोर-सिलेंडर इंजिन आहे. या एसयुव्हीमध्ये युजर्सला ऑटोमेटिक आणि मॅन्यूअल ट्रांसमिशन मिळणार आहे. या कारला 16.85kpl चा मायलेज मिळतो. या कारची एक्सशोरुम किंमत 10.91 लाख रुपये आहे.
या लीस्टमध्ये मायलेजबाबत कुशाकचा दुसरा क्रमांक लागतो. ही एसयुव्ही कार 150 एचपी, 1.5 लीटर, फोर-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. कंपनीने या कारला 6 स्पीड मॅन्यूअल किंवा 7 स्पीड डीसीटी गिअरबाक्स दिले आहेत. या कारला 17.83kpl चा मायलेज आहे. याची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 17.19 लाख रुपये आहे.
मायलेजच्या बाबतीत फॉक्सवेगनचा पहिला क्रमांक लागतो. या एसयुव्हीमध्ये 115 एचपी, 1.0 लीटर, तीन सिलेंडर इंजिन मिळतात. यामुळे गाडीचा मायलेज 6 टक्क्यांनी वाढतो. ही कार 6 मॅन्यूअल ट्रांसमिशन आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. फॉक्सवेगन टायगुन 1.0 चे ARAI च्या तुललेत 18.23kpl चा मायलेज देते. याची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 11.40 लाख रुपये आहे.