भारतीय बाजारात एक नवीन स्कूटर लॉन्च झाली आहे. एक गाडीची जितकी किंमत असते, तितकी या स्कूटरची प्राइस आहे. Vespa कंपनीची ही स्कूटर आहे. कदाचितच कोणी असा विचार केला असेल की, एका स्कूटरची किंमत 14 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. वेस्पा कंपनीच्या या स्कूटरच नाव Vespa 946 Dragon Edition आहे. या स्कूटरची किंमत Hyundai Creta आणि Mahindra Thar पेक्षा पण जास्त आहे.
ही एक लिमिटेड-एडिशन स्कूटर आहे. हॉन्गकॉन्गच्या लूनर न्यू इयर सेलिब्रेशन डे पासून ही स्कूटर इंस्पायर्ड आहे. कंपनीने म्हटलय की, या स्कूटरच्या फक्त 1888 यूनिट्सची जगभरात विक्री होईल. भारतीय बाजारात किती यूनिट्सची विक्री होणार, हे कंपनीने स्पष्ट केलेलं नाही.
Vespa 946 Dragon Edition: इंजिन डिटेल्स
Vespa 946 Dragon एडिशनमध्ये तुम्हाला 12 इंचाची चाकं, फ्रंट आणि रियरमध्ये 220mm डिस्क ब्रेक मिळेल. या स्कूटरमध्ये 150 सीसी एयर-कूल्ड इंजिन देण्यात आलय त्यातून 12.7bhp पावर आणि 12.8Nm टॉर्क जेनरेट होतो.
डिजाइन
वेस्पा स्कूटरचं लिमिटेड-एडिशन मॉडल गोल्ड रंगामध्ये आहे. या स्कूटरवर तुम्हाला हिरव्या रंगाचा ड्रॅगन बनवलेला दिसेल. ही स्कूटर स्टील प्लेट मोनोकोक फ्रेमपासून तयार करण्यात आली आहे.
Vespa 946 Dragon Edition Price
कंपनीने वेस्पा स्कूटरची किंमत 14 लाख 28 हजार रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. कंपनीकडून ही स्कूटर विकत घेणाऱ्या ग्राहकांना लिमिटेड-एडिशन Vespa Dragon Varsity जॅकेटही देण्यात येणार आहे. या स्कूटरची बुकिंग देशभरात Piaggio Motoplex शोरूममध्ये ग्राहकांसाठी सुरु झाली आहे.
Hyundai Creta आणि Mahindra Thar ची किंमत
हुंडईच्या पॉपुलर एसयूवीच्या बेस वेरिएंटची किंमत 10 लाख 99 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) आहे. दुसऱ्याबाजूला महिंद्रा थारची सुरुवातीची किंमत 11 लाख 34 हजार 999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. वेस्पा स्कूटरचीच किंमत इतकी आहे की, त्यात क्रेटा आणि थारच बेस वेरिएंट खरेदी करु शकतो.