Volkswagen | देशाच्या दक्षिण भागाला पुराचा विळखा पडला आहे. नुकसान झालेल्या गाड्यांसाठी फोक्सवॅगन (Volkswagen) आपल्या ग्राहकांना खास सेवा सुरू करणार आहे. जर्मन ऑटो कंपनी फोक्सवॅगन पॅसेंजर कार्सने बेंगळुरूमधील (Bangalore) पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या ग्राहकांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे.
कंपनीने बुधवारी सांगितले की, 30 सप्टेंबरपर्यंत ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 24 तास थेट रस्त्यांवरच मदत (Special service) दिली जाईल.
देशाच्या दक्षिण भागाला पुराचा विळखा पडला आहे. भारताचे आयटी हब समजले जाणारे बंगळुरू शहर पुरात बुडाले आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात लाखोंच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी शहरांमध्ये शिरले असून महागड्या गाड्या पुराच्या पाण्यात बुडाल्या आहेत.
फोक्सवॅगनने एका निवेदनात म्हटले आहे, की सर्वसामान्य लोकांचे जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर यावे, तसेच त्यांना पुन्हा आपल्या वाहनांचा विनासमस्या वापर करता यावा त्यामुळे कंपनीकडून ही सेवा पुरविण्यात येत आहे. केवळ पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या गाड्यांसाठी ही सुविधा देण्यात येईल. नुकसानग्रस्त वाहनांना प्राधान्याने जवळच्या डीलरशीपकडे नेले जाईल.
बंगळुरूमध्ये आलेल्या पुरात छोट्या-मोठ्या महागड्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बेंटले, लेक्सस आणि ऑडी सारखी महागडी वाहने पुराच्या पाण्यात बुडालेली दिसली. या पुरामुळे लोकांची चिंता वाढली आहे. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले की कार विम्यामध्ये पुरामुळे होणारे नुकसान कव्हर होणार की नाही?
मोटार विमा पॉलिसीचे दोन प्रकार आहेत. पहिली स्टँडअलोन थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे आणि दुसरी कॉम्प्रिहेंसिव मोटर इन्शुरन्स पॉलिसी आहे. अपघात इत्यादींमध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स उपयोगी पडतो. दुसरीकडे, कॉम्प्रिहेंसिव मोटर इंश्योरेंस पूर, चक्रीवादळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान कव्हर करते.