मुंबई : फोक्सवॅगन इंडियाने (Volkswagen India) नुकत्याच लाँच केलेल्या टिगुआन (Taigun) फेसलिफ्टची डिलिव्हरी सुरू केली आहे. फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी घोषणा केली आहे की, ही SUV 2022 च्या पहिल्या तिमाहीत विकली जाईल. कंपनी या SUV सोबत 4EVER केअर पॅकेज देत आहे. या पूर्णपणे फुली लोडेड व्हेरियंटची किंमत 31.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन 5-सीटर टिगुआन त्याच 2.0 लिटर 4 सिलेंडर TSI टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे जे स्कोडा ऑक्टाव्हिया (Skoda Octavia) आणि कोडियाकला (Kodiaq) पॉवर देते, हे इंजिन 190 bhp आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते.
7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स VW च्या 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमशी जोडलेला आहे जो ऑल-व्हील ड्राइव्हला स्टँडर्डनुसार पॉवर देतो. नवीन Tiguan हा Hyundai Tucson आणि Jeep Compass साठी एक प्रीमियम पर्याय आहे. दोन्ही मॉडेल्स पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहेत.
2021 Volkswagen Tiguan ही कार आज 32 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत (एक्स-शोरूम) या महिन्याच्या लॉन्च करण्यात आली. ही पाच सीटर एसयूव्ही फोक्सवॅगनच्या भारत 2.0 धोरणाचा भाग आहे. नवीन प्रीमियम SUV फोक्सवॅगनच्या MQB प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जी ऑटोमेकरने ऑफर केलेल्या इतर अनेक मॉडेल्ससारखीच आहे.
नवीन जनरेशन Tiguan SUV काही उल्लेखनीय बदलांसह बाजारात दाखल झाली आहे. प्रीमियम SUV मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे बदल महत्त्वाचे असू शकतात. हे नवीन मॉडेल फक्त पेट्रोल व्हेरिएंटमध्ये येईल आणि 2.0 लीटर फोर-सिलेंडर टर्बो-पेट्रोल मोटर इंजिनद्वारे सुसज्ज आहे. हे इंजिन 190hp पॉवर आउटपुट आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीने इंजिनला 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडले आहे. फोक्सवॅगनची 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम या SUV साठी स्टँडर्ड म्हणून येईल.
नवीन टिगुआनच्या इंटीरियरमध्ये डिजिटल व्हर्च्युअल कॉकपिट ड्रायव्हर डिस्प्लेसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह सुसज्ज आहे. SUV ला 30 रंगांची एम्बिएंट लायटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि एक पॅनोरमिक सनरूफ देखील मिळते जे प्रीमियम सेगमेंटला एका उंचीवर घेऊन जाते. या कारच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, कारला 6 एअरबॅग्ज, ड्राईव्ह आणि क्रूझ कंट्रोल, ABS, ESP, हिल डिसेंट कंट्रोल, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टम यांसारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
फॉक्सवॅगनने SUV चं एक्सटीरियर अपडेट केलेल्या नवीन बदलांसह क्लीन ठेवलं आहे. क्रोम अॅक्सेंटसह रिफाइन फ्रंट ग्रिल एसयूव्हीला स्टायलिश लूक देते. एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह एलईडी मॅट्रिक्स हेडलॅम्प आणि ट्रँगल फॉग लॅम्प असलेले नवीन बंपर या एसयूव्हीला त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक लूक देतात. टेलगेटच्या मध्यभागी टिगुआन अक्षरांसह स्लिमर एलईडी टेललाइट्ससह, एसयूव्हीचा मागील भाग कॉम्पॅक्ट दिसतो.
तर बातम्या
शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार
Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार
(Volkswagen starts delivery of 2021 Tiguan SUV to customers from today)