मुंबई : फोक्सवॅगनने (Volkswagen) आपल्या VW T-ROC मॉडेलची भारतात पुन्हा एकदा विक्री पुन्हा सुरू केली आहे. Volkswagen T-ROC 2021 कार आता 21.35 लाख रुपये किंमतीत भारतात खरेदी केली जात आहे. ही किंमत गेल्या वर्षी लाँच झालेल्या व्हीकलच्या किंमतीपेक्षा 1.36 लाख रुपयांनी अधिक आहे. फोक्सवॅगनने हे मॉडेल भारतात संपूर्णपणे बिल्ट-अप युनिट (CBU) म्हणून आयात केले आहे. (Volkswagen SUV VW T-ROC 2021 Makes comeback in India, check price and Features)
फोक्सवॅगनच्या एसयूव्हीमध्ये 1.5 लिटर, 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. त्याच इंजिनचा वापर Karoq एसयूव्हीमध्ये देखील केला जातो. हे इंजिन 147 बीएचपी पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारचं टॉप स्पीड ताशी 205 किलोमीटर इतकं आहे. या व्यतिरिक्त या कारमध्ये 7 स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. Volkswagen VW T-ROC ही कार 6 कलर ऑप्शन्ससह लॉन्च करण्यात आली आहे, ज्यात प्यूर व्हाइट, इनरजेटिक ऑरेंज, कुरकुमा यलो, रेवेना ब्लू, सिंगल टोन डीप ब्लॅक पियर आणि इंडियम ग्रे कलरचा समावेश आहे. या सर्व रंगांसह स्टँडर्ड रुफ देण्यात आलं आहे.
VW T-ROC च्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर यात 8.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, पॅनोरमिक सनरूफ, लेदर अपहोल्स्ट्री, प्रोजेक्टर लेन्स हेडलॅम्प, व्हर्च्युअल कॉकपीट आणि ड्युअल-टोन अॅलोय व्हील्स आहेत. या एसयूव्हीची लांबी 4229 मिमी, व्हीलबेस 2595 मिमी आहे. यासह, उत्कृष्ट व्यवस्थेसह केबिन डिझाईन करण्यात आली आहे. सेफ्टीच्या बाबतीतही ही कार दमदार आहे. टी-रॉक एसयूव्हीमध्ये ABS, ESC, 6-एअरबॅग्ज, फ्रंट-रियर पार्किंग सेन्सर्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम सारख्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
फॉक्सवॅगन (Volkswagen) कंपनीने गेल्या महिन्यात भारतात त्यांचे प्रमुख मॉडल्स पोलो (Polo) आणि वेंटो (Vento) चं ‘टर्बो वेरिएंट’ लाँच केलं आहे. नवीन टर्बो एडिशन पोलो (Turbo Edition Polo) या कारची किंमत 6.99 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर टर्बो वेंटोची (Turbo Edition Vento) किंमत 8.69 लाख रुपये (दोन्ही किंमती एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.
फॉक्सवॅगनच्या अधिकृत वेबसाईटवर आणि कंपनीच्या डीलरशिपकडे नव्या पोलो आणि वेंटोच्या टर्बो एडिशनसाठीचं बुकींग सुरु करण्यात आलं आहे. पोलो आणि वेंटोचं नवीन टर्बो एडिशन कम्फर्टलाइन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही कार्स फॉक्सवॅगनच्या 1.0l टर्बोचार्ज्ड स्ट्रॅटिफाईड इंजेक्शन (टीएसआय) इंजिन द्वारे संचालित आहे. जे 6-स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनसाठी तयार करण्यात आलं आहे. हे इंजिन 5000-5500 आरपीएम वर 81 kW मॅक्सिमम पॉवर आणि 1750-4000 आरपीएमवर 175Nm टॉर्क जनरेट करु शकतं.
फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता या दोन गाड्यांबाबतची घोषणा करताना म्हणाले की, “ग्राहकांना एक्सेसिबिलिटी आणि सुरक्षित जर्मन-इंजिन असलेली वाहनं प्रदान करणे हे फोक्सवॅगनचं मुख्य उद्धीष्ट आहे. त्यानुसार आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. ग्राहकांच्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून आम्ही पोलो आणि वेंटोचं टर्बो एडिशन सादर केलं आहे. ही वाहनं भारतीय ग्राहकांना आकर्षित करतील. दोन्ही कार्सच्या टर्बो एडिशनमध्ये ग्लॉसी ब्लॅक स्पॉयलर, ORVM कॅप्स, फेंडर बॅज आणि स्पोर्टी सीट कवर्ससह नवीन फीचर्स सादर करण्यात आले आहेत. पोलो आणि वेंटा ज्या रंगांसह सादर करण्यात आल्या होत्या त्या सर्वच रंगांमध्ये या दोन्ही कार्सचं टर्बो एडिशन उपलब्ध आहे.
हेही वाचा
बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात
भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
Tata आणि Mahindra च्या ‘या’ गाड्यांवर 3 लाखांचा डिस्काऊंट
बंपर ऑफर! 1.45 लाखांची Avenger 220 अवघ्या 45 हजारात घरी न्या#BumperOffer #BajajAvenger220 #discount https://t.co/wDf6xLx03b
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021
(Volkswagen SUV VW T-ROC 2021 Makes comeback in India, check price and Features)