ऑफ रोड ड्रायव्हिंग करायचीय? या टॉप 5 एसयुव्ही कारला पर्याय नाही…

| Updated on: Jun 01, 2022 | 2:34 PM

एसयुव्हीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या एसयुव्ही सेगमेंटकडे वळल्या आहे. अनेकांना एसयुव्ही सेगमेंटच्या कार घेणे परवडत नसल्याने कंपन्यांनी बजेट कारचीही निर्मिती केली असून यातीलच एक म्हणजे टाटा पंच नुकतीच लाँच करण्यात आली आहे.

ऑफ रोड ड्रायव्हिंग करायचीय? या टॉप 5 एसयुव्ही कारला पर्याय नाही...
Follow us on

भारतीय ऑटोमोबाईल (Automobile) बाजारातमध्ये अनेक एसयुव्ही कार लाँच होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एसयुव्ही गाड्यांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एसयुव्हीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या एसयुव्ही सेगमेंटकडे वळल्या आहे. अनेकांना एसयुव्ही सेगमेंटच्या कार घेणे परवडत नसल्याने कंपन्यानी बजेट कारचीही निर्मिती केली असून यातीलच एक म्हणजे टाटा पंच (Tata Punch) नुकतीच लाँच करण्यात आली आहे. आज आपण या लेखामध्ये ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठी सर्वात बेस्ट असणार्या एसयुव्ही कार्सची माहिती घेणार आहोत. टॉप 5 अशा एसयुव्ही (Top five suv) आहेत, ज्यांना ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठी पर्याय नाही.

1) महिंद्रा स्कॉर्पियो एन

नेक्स जनरेरशन महिंद्रा स्कॉर्पियोचे अंदाजित नाव स्कॉर्पियो एन असू शकते. या कारची विक्री 27 जूनपासून सुरु होणार आहे. नवीन मॉडेलअंतर्गत युजर्सना 2.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 2.2 लीटर टर्बो इंजिनचा पर्याय मिळणार आहे. ही ऑटोमॅटीक आणि मॅन्यूअल ट्रासमिशन पर्यायासह उपलब्ध होणार आहे. ही अपकमिंग एसयुव्ही कार 4×4 ड्रायव्हरट्रेन पर्यायासह मिळणार आहे.

2) महिंद्रा थार 5 डोर

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवीन व्हेरिएंटच्या थारवर काम करीत आहेत. या नवीन व्हेरिएंटमध्ये लाँग व्हीलबेस दिसून येणार आहेत. त्याच प्रमाणे हे नवीन 5 डोर व्हर्जनवर आधारीत असणार आहे. ही कार पुढील वर्षाच्या शेवटी लाँच होण्याची अपेक्षा आहे. 5 डोर कार सध्याच्या 3 डोर व्हेरिएंटच्या तुलनेत मोठी असणार आहे. यात 2.0 लीटर पेट्रोल आणि 2.2 लीटर डिझेलचा पर्याय असेल.

हे सुद्धा वाचा

3) फोर्स गुरखा 5 डोर

फोर्स मोर्स भारतात 5 डोर व्हर्जन लाँच करण्याची शक्यता आहे. या व्हेरिएंटचे नाव गुरखा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रोड टेस्टिंगदरम्यान, या कारला पाहिले गेले आहे. यात 3 डोर व्हर्जन असून 5 डोर व्हर्जन जुन्या वाहनाच्या तुलनेत मोठे असू शकते. यात 2.6 लीटर डिझेल इंजिन आहे.

4) मारुती सुझुकी जिम्नी

मारुती सुझुकी जिम्नी कार लवकरच भारतीय कार बाजारात दिसून शकते. या कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. ही कार थारच्या तुलनेत अधिक चांगली असू शकते. ग्लोबल मार्केटमध्ये जिम्नी कार 3 डोर्समध्ये उपलब्ध आहे. रिपोर्टस्‌नुसार, ही कार भारतात 5 सीटर आणि 7 सीटर पर्यायासह उपलब्ध होईल.

5) जीप ग्रँड चेरोकी

जीपकडून या कारची निर्मिती करण्यात येत आहे. ही कार ऑफ रोड कॅपेबिलिटीज्‌सह उपलब्ध होणार आहे. ही कार या वर्षी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. ही एक प्रीमिअम आणि लग्झरी कार असेल. यात, 2.0 लीटरचे टर्बोचाज्ड पेट्रोल इंजिन मिळणार असून यात 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन देण्यात आले आहे.