मुंंबई : पेट्रोलचे दर दररोज नवनवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. हे दर कधीच शंभरीपार गेलेले आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने एकंदर सर्वच महागाइ (Inflation) वाढली आहे. परंतु निदान इंधनाच्या माध्यमातून तुमच्या खिशाला कमी झळ बसावी यासाठी आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. या माध्यमातून तुम्ही तुमच्या दुचाकीचा मायलेज (mileage) काही अंशी वाढवू शकणार आहात. दुचाकी (bike) खरेदी करीत असताना आपण नेहमी तिच्या मायलेजचा विचार करीत असतो. कारण दुचाकीने चांगला मायलेज न दिल्यास पेट्रोल जास्त लागत असते. आधीच इंधनाचे दर वाढले अन् त्यात दुचाकीने मायलेज न दिल्यास ग्राहकांना दुहेरी भुर्दंड सोसावा लागत असतो. त्यामुळे मायलेज वाढविणाऱ्या पाच टिप्स पाहू या…