Tata Nano EV 2023 | स्वस्तातील इलेक्ट्रिक कारचे स्वप्न टाटा पूर्ण करणार? दाव्यात दम किती

| Updated on: Oct 22, 2023 | 7:22 PM

Tata Nano EV 2023 | टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये दमदार पाऊल टाकले आहे. टाटाच्या टियागो, टिगोर, अल्ट्रोज, सफारी आणि हॅरिअरची बाजारात उतरल्या आहेत. पण सर्वाधिक चर्चा होत आहे ती टाटा नॅनोच्या इलेक्ट्रिक कारची. सोशल मीडियातून तर टाटा नॅनो ईव्हीची जोरदार चर्चा रंगली आहे. काय आहे यामागील सत्य?

Tata Nano EV 2023 | स्वस्तातील इलेक्ट्रिक कारचे स्वप्न टाटा पूर्ण करणार? दाव्यात दम किती
Follow us on

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी सर्वसामान्यांना स्वस्तात कार देण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न ते जगले. भारतात सर्वात स्वस्त टाटा नॅनो आली. तिचे कौतुक झाले. पण काही वर्षांनी तिचे उत्पादन थांबवावे लागले. रतन टाटा स्वस्त कार देण्याचे स्वप्न अजूनही बाळगून आहेत. इलेक्ट्रिक कारचा जमाना आला आहे. त्यात टाटा मोटर्स पण मागे नाही. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने दमदार पाऊल टाकले आहे. टाटाच्या टियागो, टिगोर, अल्ट्रोज, सफारी आणि हॅरिअरची बाजारात उतरल्या आहेत. पण आजही चर्चा होते ती सर्वसामान्यांच्या नॅनोची. नॅनो आता नवीन ढंगात, नवीन रुपडे घेऊन इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दाखल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

काय काय दावे

समाज माध्यमांवर टाटा नॅनो ईव्हीची जोरदार चर्चा रंगली आहे. तिचा लूक, तिची वैशिष्ट्ये, तिची किंमत यावर एक नाही तर हजारो पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. विविध कॅप्शनसह, माहितीसह या पोस्ट व्हायरल होत आहे. रतन टाटा यांची ही ड्रीम कार नवीन अवतारात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. डीएनएने या सर्व बाबींचा पडताळा घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

किंमत तरी काय

समाज माध्यमांवर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. त्यात टाटा नॅनो ईव्ही लवकरच भारतात लाँच होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. काहींनी तर महिना आणि तारीख पण सांगून टाकली आहे. तर काही व्हायरल पोस्टमध्ये कारच्या नवीन आवताराची माहिती दिली आहे. ही कार बाजारात अवघ्या 2 ते 3 लाखांत मिळेल असा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात येत आहे.

दाव्यात दम तरी किती

टाटा नॅनो ईव्हीसाठी जो फोटो व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे, खरा तर तो Toyota Aygo hatchback चा आहे. ही कार भारतात विक्री होत नाही. ही एक कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार आहे. जपानच्या कार उत्पादक कंपनी त्याचे उत्पादन करते. या कारमध्ये 998cc पेट्रोल इंजिन आहे. तसेच या कारमध्ये अनेक फीचर्स आहेत.

नॅनोची इलेक्ट्रिक आवृत्ती

मूळ प्रश्न तसाच राहतो की नॅनोटी इलेक्ट्रिक आवृत्ती येणार की नाही. Tata Nano EV चे दर्शन होणार की नाही? तर नॅनोची इलेक्ट्रिक आवृत्ती येण्याची दाट शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी टाटा नॅनोच्या X3 प्लॅटफॉर्मचा वापर EV आवृत्तीसाठी करु शकते. भारतात सध्या कॉम्पक्ट इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. स्वस्तातील इलेक्ट्रिक कार विक्रीस मोठा वाव आहे. त्यामुळे कंपनी त्यावर विचार करत असल्याचे समोर येत आहे.

काय असू शकतात फीचर्स

रिपोर्टनुसार, या कारमध्ये दमदार लिथियम-आयन बॅटरी पॅक असेल. दोन बॅटरी पॅकचा पर्याय मिळू शकतो. बॅटरी फुल चार्ज झाली तर ही कार 250 किमीचा पल्ला गाठू शकेल. तर अधिक क्षमतेच्या बॅटरीच्या श्रेणीतील नॅनोला 315 किमीचा पल्ला गाठता येईल.

  1. कारमध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग असेल
  2. एसी, फ्रंट पॉवर विंडो, ब्लूटूथ, मल्टी इन्फॉर्मेशनल डिस्प्ले असेल
  3. रिमोट लॉकिंग सिस्टिम, अँड्रॉईड ऑटोचा पर्याय मिळेल
  4. 7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असू शकते