Yamaha MT- 15 मॉन्सटर एनर्जी मोटो जीपी एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Aug 24, 2021 | 3:28 PM

इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने (India Yamaha Motor Private Limited) सोमवारी एमटी -15 मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटो जीपी एडिशन लॉन्च करण्याची घोषणा केली.

Yamaha MT- 15 मॉन्सटर एनर्जी मोटो जीपी एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us on

मुंबई : इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने (India Yamaha Motor Private Limited) सोमवारी एमटी -15 मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटो जीपी एडिशन लॉन्च करण्याची घोषणा केली. या ट्रॅक-इंस्पायर्ड मोटरसायकलची किंमत 147,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. नवीन मोटारसायकल FZ-X रेट्रो-थीमवाल्या निओ-रोडस्टरला फॉलो करते जी काही महिन्यांपूर्वी सादर केली गेली होती. (Yamah MT 15 Monster Energy Yamaha Moto GP Edition launched in India, here’s the price)

जपानी दुचाकी कंपनीने दावा केला आहे की, ही मोटरसायकल कंपनीच्या ‘द कॉल ऑफ द ब्लू’ ब्रँडच्या डायरेक्शनखाली लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक स्टँडर्ड MT-15 पासून स्वतःला वेगळे करण्याच्या प्रयत्नात अनेक कॉस्मेटिक अपडेट्ससह येते. बाईकमध्ये जे सर्वात प्रॉमिनेंट डिझाइन एलिमेंट देण्यात आलं आहे, ते म्हणजे यामाहा मोटो जीपीचं ब्रँडिंग जे टँक श्राउड्स, फ्यूल टँक आणि साइड पॅनल्सवर देण्यात आलं आहे. याच्या मदतीने गाडीला रेसिंग बॅकग्राऊंडची झलक मिळते.

दमदार इंजिन

बाईक फुल ब्लॅक थीम पेंटसह येते. मोटारसायकलमध्ये ग्रीन बॉडी डिकल्स देण्यात आले आहेत. नेकेड स्ट्रीटफाइटर R15V3 मध्ये दिसलेल्या अचूक डेल्टा बॉक्स चेसिसवर आधारित आहे. डिझाईनच्या बाबतीत, वाहन आक्रमक दिसते. यामध्ये तुम्हाला 155 सीसी फ्यूल इंजेक्टेड लिक्विड कूल्ड, फोर स्ट्रोक, SOHC, फोर व्हॉल्व्ह इंजिन मिळते. हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशनला जोडलेले आहे, जे 10,000 आरपीएमवर 18.5 पीएस आणि 8500 आरपीएमवर 13.9 एनएम टॉर्क उत्पन्न करते.

फीचर्स

वाहनामध्ये देण्यात आलेले फीचर्स MT-15 सारखेच आहेत. यात साइड स्टँड इंजिन कट ऑफ, वन असिस्ट, वन स्लिपर (A&S) क्लच, सिंगल चॅनेल ABA, व्हेरिएबल व्हॉल्व अॅक्च्युएशन सिस्टीम आहे जी तुम्हाला डेल्टा बॉक्स फ्रेमवर मिळते.

मोटरसायकलला 138 किलो कर्ब वेट मिळते. दुसरीकडे, आपल्याला बाय फंक्शनल एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाइट, मल्टी-फंक्शन एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, गियर पोझिशन इंडिकेटर, युनि-लेव्हल सीट आणि ग्रॅब बार मिळतात. यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

नव्या अवतारात Royal Enfield Classic 350 लाँचिंगसाठी सज्ज, ‘हे’ महत्त्वाचं फीचर मिळणार नाही

अवघ्या 25 हजारात खरेदी करा जबरदस्त मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Honda ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 130 किलोमीटर रेंज

(Yamah MT 15 Monster Energy Yamaha Moto GP Edition launched in India, here’s the price)