Budget 2021: सोने-चांदी, चप्पल स्वस्त होणार; मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, इलेक्ट्रिक वस्तू महागणार

| Updated on: Feb 01, 2021 | 1:25 PM

ऐन लग्नसराईच्या दिवसात केंद्र सरकारने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. (Budget 2021-22: FM Nirmala Sitharaman slashes custom duty on gold)

Budget 2021: सोने-चांदी, चप्पल स्वस्त होणार; मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, इलेक्ट्रिक वस्तू महागणार
Follow us on

नवी दिल्ली: ऐन लग्नसराईच्या दिवसात केंद्र सरकारने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होणार आहे. तसेच चप्पल आणि स्वदेशी कपडेही स्वस्त होणार असून मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, तांबे आणि इलेक्ट्रिक उपकरणे स्वस्त होणार आहेत. (Budget 2021-22: FM Nirmala Sitharaman slashes custom duty on gold)

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. कोरोनामुळे केंद्र सरकार अनेक गोष्टी महाग करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आजच्या अर्थसंकल्पातून सीतारामन यांनी देशवासियांवर कोणताही भार येऊ दिला नाही. उलट देशवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या इम्पोर्ट ड्युटी 12.5 टक्के एवढी तर जीएसटी 3 टक्के एवढी आहे. खूप काळापासून सोन्याची इम्पोर्ट ड्युटी कमी करावी तसच जीएसटीतही सुधारणा करावी अशी मागणी व्यापारी करत होते. त्याचा काहीसा परिणाम या अर्थसंकल्पात पाहायला मिळाला आहे. सीतारामन यांनी सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोने आणि चांदी स्वस्त होणार आहे.

कस्टम ड्युटी किती टक्के कमी होणार?

निर्मला सीतारामन यांनी सोने, चांदी आणि तांब्यावरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होणार आहे.

या गोष्टी स्वस्त होणार

सोने, चांदी, तांब्याच्या वस्तू, स्वदेशी कपडे, चप्पल, नायलॉनचे कपडे, स्टील उपकरणे.

या वस्तू महागणार

मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, इलेक्ट्रिक वस्तू, ठरावीक ऑटोपार्ट्स. (Budget 2021-22: FM Nirmala Sitharaman slashes custom duty on gold)

 

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत, कररचना जशीच्या तशी!

Banking Sector Union Budget 2021: मोठी बातमी! मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार

Vehicles scrapping Budget 2021: जुन्या वाहनांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, 5 वर्ष जास्त काळ चालवू शकाल गाडी

(Budget 2021-22: FM Nirmala Sitharaman slashes custom duty on gold)