बजेट 2022 : सरकारचे स्टार्टअप आणि फिनटेकला प्रोत्साहन आवश्यक

| Updated on: Jan 26, 2022 | 11:48 AM

गेल्या वर्षी ठरली यशस्वी जेटाचे बँकिंग अध्यक्ष मुरली नायर यांच्यानुसार 2021 वर्ष भारतीय फिनटेक आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी अभूतपूर्व यशस्वी ठरले. 2022-2023 च्या बजेटमध्ये या क्षेत्रातील प्रगतीचा आलेख लक्षात घेण्याजोगा आहे. आगामी काळातही या क्षेत्रातील भरभराट कायम रहावी म्हणून या क्षेत्राकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

बजेट 2022 :  सरकारचे स्टार्टअप आणि फिनटेकला प्रोत्साहन आवश्यक
Budget-2022
Follow us on

नवी दिल्ली : करोनाच्या संकटाचे पडसाद उद्योग क्षेत्रावर दिसून आले. संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाला. तरीही याही काळात काही क्षेत्रात जबरदस्त प्रगती पहायला मिळाली. या क्षेत्रात ‘फिनटेक’ म्हणजे वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांचाही समावेश आहे. सोबतच स्टार्टअपच्या विश्वातूनही छान बातमी मिळाली. जर भारताचा विचार केला तर या दोन्ही क्षेत्रात 2021 मध्ये लक्षवेधी प्रगती पहायला मिळाली. अशावेळी फिनटेक आणि स्टार्टअपच्या क्षेत्रातील घडामोडींकडे लक्ष देण्याची गरज आहे असे तज्ज्ञ म्हणतात. 2021 मध्ये भारतीय फिनटेक आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी अविश्वसनीय ठरले. यावर्षी 40 हून अधिक स्टार्टअपला युनिकॉर्न दर्जा मिळाला. इतकेच नाही तर 2021 मध्ये या क्षेत्रात खूप जबरदस्त कामगिरी पहायला मिळाली. जर फिनटेक उद्योगांचा विचार केला तर या काळात भारतात डिजिटल पेमेंट क्षेत्रात वृद्धी झाली. या वर्षात लोकांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल आर्थिक व्यवहार केले. 2022-23 च्या बजेटमध्ये या क्षेत्रातील वृद्धी विचारात घ्यावी लागेल. आगामी काळातही ही वृद्धी कायम रहावी म्हणून त्यांना प्रोत्साहन आवश्यक आहे.

पारदर्शक व्यवहारात या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका

डिजिटल पेमेंट क्षेत्रातील वाढती वृद्धी पाहता ग्राहक, व्यापारी आणि त्याच्या इकोसिस्टीमला मजबूत करणाऱ्या लोकांना टँक्स इंसेंटिव्ह देण्याचा विचार झाला पाहिजे. डिजिटल पेमेंटसाठी सक्षम इकोसिस्टीम आर्थिक विकासासाठी मल्टिप्लायर होऊ शकतो. या क्षेत्राला वाढवण्यासाठी आर्थिक विकासाला गती दिल्या जावू शकते. सोबतच हे क्षेत्र पारदर्शक आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. फिनटेक क्षेत्राच्या नाविन्यतेमध्ये वृद्धीसाठी बँका आणि फिनटेक यांच्यामध्ये सामंजस्यला प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी अर्थव्यवस्थेला वित्तीय समावेशाच्या धारणेस मदत मिळेल. आशा आहे की नव्या बजेटमध्ये मॉडर्न पेमेंट फ्रेमवर्क तयार करण्यासाठी आवश्यक पाऊलांची समावेश हवा. जो येत्या बदलत्या काळात एकदम अभूतपूर्व पद्धतीने आणि प्रभावीपणे काम करण्यास सक्षम होईल.

इतर बातम्या

Budget 2022: पर्यटन उद्योगाला ‘वन इंडिया वन टूरिज्म’ पॉलिसीची अपेक्षा , सरकारकडे वीजा फीस माफ व्हावी यासाठी केली मागणी !

Budget 2022: केंद्राचं ‘मिशन बूस्टर’, अर्थसंकल्पात व्यापक लसीकरण कार्यक्रमाची घोषणा?