नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी बजेट (Budget 2022) सादर केला आहे. संसदेत त्यांच्या बजेट भाषणास सुरुवात झाली आहे. बजेट भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी देशवासियांना दिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट आहे. विकास हाच या बजेटचा हेतू असून शेतकरी, महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून हा बजेट तयार करण्यात आल्याचं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं. तसेच देशाच जीडीपी पुढील आर्थिक वर्षात 9.2 टक्के राहणार असल्याचं सांगून अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार असल्याचं सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या दोन वर्षापासून भारतासह (india) देश कोरोना संकटाशी झुंज देत असताना सीतारामण यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा करून देशवासियांना मोठा दिलासा दिला आहे.
निर्मला सीतारामण यांचा हा चौथा बजेट आहे. बरोबर सकाळी 11 वाजता त्यांनी संसदेत बजेट भाषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी या अर्थसंकल्पात पुढील 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट असल्याचं म्हटलं आहे. बजेटमध्ये महिला, तरुण आणि शेतकऱ्यांवर फोकस करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वाचं कल्याण व्हावं, हे मोदी सरकारचं धोरण आहे. देशाची अर्थव्यवस्था गती पकडत आहे. त्यामुळे आम्ही विकास हाच केंद्रबिंदू ठेवला आहे, असं सीतारामण म्हणाल्या.
येत्या तीन वर्षात देशात 400 नव्या वंदेभारत ट्रेन चालवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच या तीन वर्षात पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल तयार करण्यात येणार आहे. 8 नव्या रोपवेची निर्मिती करण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अर्थसंकल्पातून शेतकरी. तरुणांचा फायदाच होणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत देशातील 16 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एअर इंडियाची गुंतवणूक पूर्ण झाली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढील आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दर 9.2 टक्के राहणार आहे. अर्थव्यवस्थेतील हा आकडा सर्वात मोठा आहे, असंही त्या म्हणाल्या.
देशभरात अभ्यासक्रमात फार्मिंग कोर्सचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व राज्यांना प्रोत्साहित केलं जाणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित हे कोर्स असतील.
VIDEO : Dr. Bhagwat Karad | Loksabhaमध्ये Union Budget सादर होणार, भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा दिवस#DRBhagwatKarad #Loksabha #UnionBudget
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/5fSJ1y9zxF
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 1, 2022
संबंधित बातम्या:
Budget 2022: देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज, जुमलेबाजी नको; बजेटपूर्वीच काँग्रेसची टीका
Budget 2022 : मनमोहन Vs मोदी सरकार, कोणाच्या काळात करदात्याला दिलासा, कोणामुळे रिकामा झाला खिसा?